AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG: विराट कोहलीसोबत रोहितही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होणार का? असं होऊ शकतं कारण…

भारत आणि अफगाणिस्तान यांच्याती क्रिकेट मालिका 6 जूनपासून सुरु होत आहे. या मालिकेत विराट कोहली खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर रोहित शर्माही या मालिकेत खेळणार की नाही याबाबत शंका आहे. निवड समिती रोहित शर्माबाबत 6 जूनला बैठक घेऊन अंतिम निर्णय घेईल.

IND vs AFG: विराट कोहलीसोबत रोहितही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होणार का? असं होऊ शकतं कारण...
IND vs AFG: विराट कोहलीसोबत रोहितही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होणार का? असं होऊ शकतं कारण...Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 04, 2026 | 8:20 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं वारं वाहून लागलं आहे. दोन महिन्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात अफगाणिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेपासून होणार आहे. 6 जूनपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. तर 14 जूनपासून या दोन संघात वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त वनडे फॉर्मेट खेळत असल्याने त्यांच्या चाहत्यांना या दोघांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीट टीम इंडियाला धक्का बसला आहे. कारण विराट कोहली या मालिकेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. तर रोहित शर्माही दुखापतीमुळे त्रस्त असल्याने त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

विराट कोहलीसारखीच रोहित शर्मालाही हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळेच रोहित शर्मा आयपीएल 2026 स्पर्धेतील काही सामन्यांना मुकला होता. त्यानंतर त्याने काही सामने खेळले, पण इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजी केली. असं असताना फिट आहे की नाही याबाबत साशंकता आहे. रोहित शर्माला फिटनेससाठी हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे खेळेल की नाही याबाबत अजून काही सांगणं कठीण आहे. पण विराट कोहलीसोबत रोहित शर्माही या मालिकेला मुकला तर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना वनडे संघात संधी मिळू शकते.

निवड समिती 6 जून रोजी एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत अफगाणिस्तान मालिका आणि आयर्लंड-इंग्लंडच्या दौऱ्यासाठी संघाची निवड केली जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फिटनेसचा अहवाल जाणून घेतल्यानंतर संघाची घोषणा केली जाईल. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागून आहे. बीसीसीआय आगामी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघ बांधणी करत आहे. त्यासाठी आता एका वर्षांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे काही खेळाडूंना जास्तीत जास्त वनडे संघात संधी देण्याचा प्रयत्न असेल. जेणेकरून संघ बांधता येईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघं आता फक्त वनडे सामने खेळत आहेत. त्यामुळे एकंदरीत विचार करूनच पावलं टाकावी लागणार आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...