AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, विराट कोहली वनडे मॅचमधून बाहेर

भारतीय संघाटाला मोठा झटका बसला आहे. विराट कोहलीने वनडे मालिकेत खेळण्यास नकार दिला आहे.

मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, विराट कोहली वनडे मॅचमधून बाहेर
| Updated on: Jun 04, 2026 | 12:18 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. १९ मे रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मासोबत विराट कोहलीची वनडे संघात निवड करण्यात आली होती. ते ऐकून चाहत्यांना आनंद झाला होता. आता भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली संघातून बाहेर पडला आहे. पीटीआयने (PTI) बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांच्या हवाल्याने या बातमीची माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विराट कोहलीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाही. मात्र, याबाबत अधिकृत निवेदन येणे अद्याप बाकी आहे.

१९ मे रोजी संघात निवड, ४ जूनला बाहेर!

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा १९ मे रोजी करण्यात आली होती. यामध्ये रोहित शर्मासोबत विराट कोहलीचीही वनडे संघात निवड झाली होती. पण, पीटीआयच्या वृत्तानुसार विराट कोहली आता अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना दिसणार नाही. बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही.

भारत-अफगाणिस्तान वनडे मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात १३ जूनपासून होणार आहे. पहिला वनडे सामना धर्मशाला येथे खेळवला जाईल. दुसरा वनडे सामना १७ जूनला लखनौमध्ये खेळवला जाईल. तर २० जूनला दोन्ही संघ तिसरा वनडे सामना चेन्नईच्या मैदानावर खेळतील.

दुखापतीमुळे विराट बाहेर! चाहत्यांची प्रतीक्षा वाढली

विराट कोहलीने नुकतेच आरसीबीला (RCB) सलग दुसऱ्यांदा आयपीएल २०२६ चे (IPL 2026) विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली होती. ६७५ धावांसह तो या लीगमध्ये आरसीबीचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. बऱ्याच काळानंतर विराटला वनडे खेळताना पाहण्याची प्रत्येक क्रिकेट चाहत्याची प्रतीक्षा होती. पण, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने विराटच्या चाहत्यांची ती प्रतीक्षा आणखी वाढवली आहे.

रोहित शर्माचे काय होणार?

विराट कोहली वनडे मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी समोर आल्यानंतर आता सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर खिळल्या आहेत. रोहित देखील फिटनेसच्या समस्येशी झगडत आहे. अशा परिस्थितीत मोठा प्रश्न हा आहे की, तो अफगाणिस्तानविरुद्धची संपूर्ण मालिका खेळू शकेल का?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...