AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; रूपाली ठोंबरे केंद्रीय मंत्र्यांवर भडकल्या, पुण्यात नेमकं काय घडलं?

रुपाली पाटील ठोंबरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. एका बॅनरवरून त्यांना थेट मोठा इशारा दिला आहे.

छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास सोडणार नाही; रूपाली ठोंबरे केंद्रीय मंत्र्यांवर भडकल्या, पुण्यात नेमकं काय घडलं?
rupali thombareImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 1:15 PM
Share

पुण्यासह देशभरात दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. नागपुरात विजया दशमी उत्सव सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या व्यतिरिक्त विविध शहरातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन पार पडले. भाजपच्या अनेक मंत्र्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवकाच्या आयोजित कार्यक्रमासाठी बॅनरबाजी केली होती. पुण्यातही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी बॅनरबाजी केली. या बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी हेडगेवार आणि गोवळकर यांचे फोटो दिसून आले. यावरून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आक्षेप घेतला. या बॅनरवरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मोठा इशारा दिला आहे.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, ‘खासदार मुरलीधर मोहोळ यांचा मी जाहीर निषेध करते.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो हेडगेवार, गोळवलकर त्यांच्यासोबत लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. ते तुम्ही सातत्याने का करताय? छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कराल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. भाजपच्या प्रतिनिधींना मेंदू असेल, तुम्ही शिकलेले असाल, तर जागृत होऊन शिवाजी महाराज यांचा अवमान होणार नाही, याची जर काळजी घ्यावी. ही काळजी घेतली नाही, तर आम्हाला वेगळ्या मार्गाने उत्तर द्यावे लागेल’.

भाजपकडून राष्ट्रवादीला मिळणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना ठोंबरे पुढे म्हणाल्या, ‘अजित पवार असल्यापासून भाजपाकडून आम्हाला जी वागणूक मिळत आहे, ती काही लपवून राहिली नाही. भाजपकडून आम्हाला वागणूक मिळत आहे, ती सातत्याने आम्ही पक्षश्रेष्ठी सुनेत्रा पवार,पार्थ पवार यांना सांगितली आहे. सोमेश्वर निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी तेरा वर्ष ज्यांच्यावर विश्वास टाकून कारखाना चालवण्यासाठी दिला. तो व्यक्ती वेगळे पॅनल तयार करतोय. त्यांना भाजप मदत करत असेल, तर या सर्व गोष्टींना सामोरे जात जनतेने त्यांना त्यांची लायकी दाखवली आहे’.  पदवीधर, शिक्षक निवडणुकीवर त्या म्हणाल्या, ‘ पदवीधरला आम्हाला विचारात न घेता उमेदवार देत असाल आणि तो उमेदवार आमच्यावरती लादत असाल. आम्हाला अशी वागणूक सातत्याने देत असतील, तर आजही आमच्या मनात खंत आहे, ज्यांच्या सोबत आम्ही मित्रपक्ष म्हणून बसलेलो आहोत’.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...