Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून आता मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र विविध हवामानातील बदलांमुळे तो अपेक्षेपेक्षा उशिराने केरळमध्ये पोहोचला. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आता केरळमध्ये सक्रिय झाला असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तळकोकण आणि गोवा परिसरात पुढील 48 ते 72 तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर भागांतही मान्सूनचा विस्तार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्याची तयारी करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घरांची डागडुजी, तर शहरी भागात नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 04, 2026 05:31 PM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...