AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्षात बंडखोरीची भीती, या नेत्याला तातडीचा निरोप, थेट मुंबईत बोलावून घेतलं, घडामोडींना वेग

एकीकडे राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून नेत्याला थेट मुंबईत बोलावण्यात आलं.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्षात बंडखोरीची भीती, या नेत्याला तातडीचा निरोप, थेट मुंबईत बोलावून घेतलं, घडामोडींना वेग
Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 6:39 PM
Share

राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं, परंतु शेवटच्या क्षणी ही बंडखोरी मोडून काढण्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर मात्र मोठा धक्का बसला आहे. ऐनवेळी उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेताच निवडणुकीतून माघार घेतली आहे.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. तसेच छत्रपती संभाजीनगर -जालना विधान परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या  देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

दरम्यान त्यानंतर जळगावमध्ये अशी स्थिती होऊ नये, उमेदवाराने माघार घेऊ नये म्हणून जळगावमधील विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला थेट मुंबईत बोलवून घेण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून खबरदारी घेत उमेदवार शरद तायडे यांना थेट मुंबईत बोलवून घेण्यात आले.

उमेदवाराने माघार घेऊ नये, यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या माध्यमातून शरद तायडे यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांकडून दबाव व माघारीचा संभाव्य धोका लक्षात घेत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाराला मुंबईत बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. शरद तायडे यांच्यासोबत ठाकरे गटाचे जळगावचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील हे देखील मुंबईत होते. अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर  शरद तायडे यांनी संजय राऊत यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जळगाव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी देखील या वृत्ता दुजोरा दिला.

Follow Us
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार