AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरेंचा मोठा निर्णय, 3 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हाकालपट्टी, ठाकरे गटात मोठी खळबळ

एकीकडे सध्या राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हाकालपट्टी केली आहे.

विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरेंचा मोठा निर्णय, 3 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हाकालपट्टी, ठाकरे गटात मोठी खळबळ
बड्या नेत्याची शिवसेना ठाकरे गटातून हाकालपट्टी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 5:18 PM
Share

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात वेगवान घडमोडी घडल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक जणांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली होती. या बंडखोरीचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसेल असं चित्र होतं. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश आलं.  मात्र अजूनही काही मतदारसंघात बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मात्र या उलट महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती पहायला मिळाली. महाविकास आघाडीकडून  विधान परिषदेसाठी जे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते, त्यातील काही जणांनी अचानक आज निवडणुकीतून माघार घेतली. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे, त्यांची पक्षातून तडकाफडकी हाकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर -जालना मतदारसंघातून देवयानी डोनगावकर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून देवयानी डोनगावकर आणि कृष्णा डोनगावकर यांची देखील पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याचा ठपका या सर्व नेत्यांवर ठेवण्यात आला आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून या तीनही नेत्यांची तडकाफडकी हाकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकरामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल