AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरएसएस शताब्दी वर्ष : डॉ.मोहन भागवत यांचा लंडन दौरा, ६ सप्टेंबर रोजी “सेलिब्रेशन ऑफ ऑननेस” सोहळा

आरएसएसचे शताब्दी वर्ष सुरु आहे.आरएसएसचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत लंडनच्या दौऱ्यावर असून येत्या ६ सप्टेंबर रोजी “सेलिब्रेशन ऑफ ऑननेस” सोहळा होणार असून यामध्ये ब्रिटनमधील ३१० हून अधिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

आरएसएस शताब्दी वर्ष : डॉ.मोहन भागवत यांचा लंडन दौरा, ६ सप्टेंबर रोजी “सेलिब्रेशन ऑफ ऑननेस” सोहळा
mohan bhagwat
| Updated on: Sep 04, 2026 | 6:20 PM
Share

१९२५ मध्ये भारतातील हिंदू सांस्कृतिक आणि सभ्यतामूलक परंपरांवर आधारित स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस ) या संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त जगभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत २ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लंडन दौऱ्यावर आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी आरएसएसची स्थापना केली. राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी एक मजबूत आणि संघटित समाज आवश्यक असल्याचा त्यांचा विश्वास होता. गेल्या शतकभरात संघ स्वयंसेवकांच्या माध्यमातून समाजसेवा करणारी एक व्यापक सभ्यतामूलक चळवळ म्हणून विकसित झाला आहे.

शंभर वर्षांची सेवा

गेल्या शंभर वर्षांत आरएसएसने “वसुधैव कुटुंबकम्” — म्हणजेच “संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे” — या तत्त्वावर आधारित समाजसेवेची परंपरा निर्माण केली आहे. व्यक्तिमत्त्व विकास हा समाजाच्या बळकटीकरणाचा पाया असल्याचे संघ मानतो.

आरएसएसच्या २०२५–२६ च्या वार्षिक अहवालानुसार, शिक्षण, आरोग्यसेवा, सामाजिक कल्याण, स्वावलंबन आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये भारतभर १,५२,००० हून अधिक सेवा प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तसेच देशभरात १,३४,००० पेक्षा अधिक नियमित स्थानिक उपक्रम, दैनंदिन शाखा तसेच साप्ताहिक आणि मासिक बैठका आयोजित केल्या जातात.

संघाच्या मते, त्याचे कार्य सामायिक सांस्कृतिक मूल्ये, विविधतेतील एकता आणि सामाजिक समरसता यांवर आधारित आहे. समाजातील ऐक्य वाढविणे आणि सर्व प्रकारच्या विभाजनवाद, कट्टरता आणि हिंसेचा विरोध करणे हा त्याचा उद्देश आहे. शताब्दी वर्षानिमित्त संघाने समाजासाठी पाच प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत — सामाजिक समरसता, कुटुंबमूल्यांचे संवर्धन, पर्यावरणीय जबाबदारी, स्वावलंबन आणि नागरी कर्तव्यभावना.

विस्तारित सभ्यतामूलक संवाद

शताब्दी वर्षात आरएसएसने जगभरातील विविध समुदाय आणि संस्थांशी अधिक व्यापक संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. एप्रिल २०२६ मध्ये संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी युनायटेड किंगडम, अमेरिका आणि जर्मनीचा दौरा केला. लंडनमधील चॅथम हाऊस, अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि हडसन इन्स्टिट्यूट तसेच बर्लिनमधील प्रमुख धोरणविषयक संस्थांमध्ये त्यांनी संवाद साधला.

या चर्चांमध्ये शिक्षणतज्ज्ञ, संसद सदस्य, उद्योगपती, समुदाय प्रतिनिधी आणि भारतीय वंशाच्या नागरिकांचा सहभाग होता. सभ्यतामूलक दृष्टिकोन, सामाजिक एकात्मता आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

त्यानंतर डॉ. भागवत यांनी न्यूयॉर्क, टोरांटो आणि आता लंडनमध्ये हा संवाद पुढे नेला. २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्क येथे AHEAD ( American Hindus for Engagement and Dialogue) च्या निमंत्रणावर आयोजित बहुधर्मीय परिषदेत त्यांनी सहभाग घेतला. या परिषदेत विविध धर्म आणि पंथांचे १७५ प्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच त्यांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित “युनिव्हर्सल ऑननेस” परिषदेत भाषण केले. या परिषदेत अमेरिकेतील ३९ राज्यांतील ८५३ शहरांमधून आलेल्या ६,००० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सुमारे २५० विद्यापीठीन विद्यार्थ्यांनीही या संवादात सहभाग नोंदविला. परिषदेत पाच कलमी “कॉल फॉर अ‍ॅक्शन” ठराव मंजूर करण्यात आला.

यानंतर डॉ. भागवत यांनी CHORD (Canadian Hindus for Outreach, Relations and Dialogue) च्या निमंत्रणावर टोरांटो येथे “हिंदू विश्वबंधु” परिषदेला संबोधित केले. या कार्यक्रमात कॅनडातील सर्व दहा प्रांतांमधील १७५ संस्थांचे २,००० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले.

लंडन भेट

डॉ. भागवत २ सप्टेंबर रोजी लंडनमध्ये पोहोचले. या दौऱ्याचे समन्वयन “इंटिग्रल” या ब्रिटनस्थित संस्थेने केले होते. ही संस्था ब्रिटन आणि भारतातील समुदाय आणि नेतृत्व यांच्यात संवाद, सहकार्य आणि दीर्घकालीन संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत आहे.

ब्रिटनमधील ११५ हून अधिक सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी डॉ. भागवत यांच्या स्वागतासाठी आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहकार्य केले होते.

या दौऱ्यादरम्यान डॉ.भागवत विविध धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांशी भेटीगाठी घेतल्या आहेत. आंतरधर्मीय संवादाच्या भाग म्हणून त्यांनी विल्स्डेन येथील श्री स्वामीनारायण मंदिर आणि खालसा जथा ब्रिटिश आयल्स गुरुद्वाराला भेट दिली असून, लंडनमधील एका जैन मंदिरालाही भेट देण्याचे नियोजन आहे.

“सेलिब्रेशन ऑफ ऑननेस”

६ सप्टेंबर २०२६ रोजी “सेलिब्रेशन ऑफ ऑननेस” या विषयावर समुदाय नेत्यांचा सत्कार आणि सभ्यतामूलक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम हिंदू स्वयंसेवक संघ यूके (HSS UK) यांच्या पुढाकाराने आणि इंटिग्रलच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये ब्रिटनमधील ३१० हून अधिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडममधील या संवादमालिकेद्वारे डॉ. भागवत आरएसएसच्या निः स्वार्थ सेवा, सामाजिक समरसता आणि “वसुधैव कुटुंबकम्” — “संपूर्ण जग एक कुटुंब आहे” — या विचारांचा प्रसार करत आहेत.

– सुनील आंबेकर –

सदस्य, केंद्रीय कार्यकारिणी; प्रमुख, माध्यम आणि जनसंपर्क विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)

Follow Us
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार