AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात

Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात

| Updated on: Sep 04, 2026 | 5:33 PM
Share

मराठा आरक्षणाबाबत सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांना हरताळ फासला असून, हा प्रश्न सोडवण्याची सरकारची मानसिकता नाही, अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला निषेधार्ह असून, राज्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्र्याची नेमणूक आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जरांगेंच्या तब्येतीला काही झाल्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

सतेज पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांना सरकारने सातत्याने हरताळ फासला असून, हा प्रश्न सोडवण्याची शासनाची मानसिकता दिसत नाही, असे ते म्हणाले. नवी मुंबईत मराठा समाजाने शक्तीप्रदर्शन केले, तेव्हा मागण्या मान्य केल्याचे भासवून समाजाची फसवणूक केली गेली, असा आरोप त्यांनी केला.

राज्यात विद्यानंद बापट यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्थ असल्याचे सांगत, पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात जनतेला सुरक्षित वाटण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री असणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. जरांगे पाटलांच्या तब्येतीला काही झाल्यास त्याला महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. तसेच, गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी राजू शेट्टींसह शेतकऱ्यांनी लावून धरली आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

Published on: Sep 04, 2026 05:33 PM

Follow Us