Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
नळदुर्ग किल्ल्यावर कुस्तीपटू अश्विनी पोळ यांनी आपल्या तीन मुलांसह उपळी बुरुजावरून उडी घेऊन आत्महत्या केली. यात अश्विनी पोळ आणि दोन मुलांचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर एका राष्ट्रीय कुस्तीपटूने आपल्या तीन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अश्विनी मनोहर पोळ (वय ३०) असे या मयत कुस्तीपटूचे नाव असून, त्यांनी आपला साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि दोन जुळ्या मुली स्वरा व क्रांती यांच्यासह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून सुमारे १०० फूट खाली उडी घेतली.
या घटनेत अश्विनी पोळ आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. दोन जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, स्वरा हिची प्रकृती चिंताजनक आहे. किल्लेदारांच्या माहितीनुसार, अश्विनी पोळ यांनी केक कापण्यासाठी किल्ल्यात प्रवेश केला होता, परंतु आत परवानगी नसल्याने त्या बाहेर जाऊन परत आल्या. त्यांनी त्यांचे पती अर्ध्या तासात येणार असल्याचे सांगितले होते.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नळदुर्ग पोलिसांनी मयत अश्विनी पोळ यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी चार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Published on: Sep 04, 2026 04:47 PM
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!

