AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शासकीय कांदा खरेदीचा बाजार समित्यांना असाही आर्थिक फटका ?, शेतकऱ्यांची देखील सरकारकडे पुन्हा नवीन मागणी

राज्यातील कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शासकीय कांदा खरेदी सुरु केल्यामुळे बाजार समित्यांना मात्र आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांना सुमारे 3 कोटी 16 लाख रुपयांच्या शुल्कावर पाणी सोडावे लागणार आहे.

शासकीय कांदा खरेदीचा बाजार समित्यांना असाही आर्थिक फटका ?, शेतकऱ्यांची देखील सरकारकडे पुन्हा नवीन मागणी
Government Onion Procurement Begins
| Updated on: Jun 04, 2026 | 7:37 PM
Share

राज्य सरकारच्या पणन संचालनालयाने शासकीय कांदा खरेदीवर बाजार समिती शुल्क माफ करणारे आदेश परिपत्रक काढत दिले आहेत. त्यामुळे नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीवर बाजार समित्या शुल्क आकारू शकणार नाहीत. यंदा लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सुमारे 316 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. या शुल्क माफीमुळे बाजार समित्यांचे 3 कोटी 16 लाख रुपयांचे संभाव्य नुकसान होणार आहे. त्यातच व्यापाऱ्यांनीही शुल्क माफीची मागणी केल्याने बाजार समित्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासकीय कांदा खरेदी केंद्रांमधून सुरू असलेली उन्हाळी कांद्याची खरेदी थेट बाजार समित्यांमधून करण्याची शेतकऱ्यांची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बाजार समित्यांमधून कांदा खरेदी मुभा देण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग पणन संचालनालयाने 3 जून रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार नाफेड आणि एनसीसीएफमार्फत बाजार समित्यांमधून होणाऱ्या शासकीय कांदा खरेदीवर बाजार समित्यांनी कोणतेही शुल्क आकारू नये,असे निर्देश देण्यात आले आहेत. शुल्कमाफीमुळे बाजार समित्यांचे 3 कोटी 16 लाख रुपयांचे संभाव्य नुकसान आहे. या कांदा खरेदीच्या निर्णयाने बाजार समित्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बाजार समित्यांच्या उत्पन्नावर परिणाम

नाशिक मधून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 1,580 रुपये प्रति क्विंटल दराने सुमारे 316 कोटी रुपयांचा कांदा खरेदी होण्याची शक्यता आहे. या व्यवहारावर बाजार समित्यांना मिळणारे 1 टक्का बाजार शुल्क विचारात घेतल्यास सुमारे 3 कोटी 16 लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. या निर्णयामुळे बाजार समित्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. यातच व्यापारी वर्गानेही आक्षेप नोंदवत शासकीय खरेदीप्रमाणेच खासगी कांदा व्यवहारांवरही शुल्क आकारू नये, अशी मागणी पुढे केली आहेय त्यामुळे बाजार समित्यांच्या महसुलावर आणखी परिणाम झाल्यास बाजार समित्याचा कारभार कसा चालणार ? असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांचे लक्ष

शासकीय कांदा खरेदीसाठी आठवडाभरात शासनाने दोन परिपत्रके काढले आहेत. कांदा खरेदी दरात ३ रुपये ४५ पैशांची वाढ केल्याने आता कांदा खरेदी शासकीय दर १५.८० रुपये प्रतिकिलो झाला आहे. कांदा खरेदीतील जाचक अटी शिथिल करुन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा आहे. मात्र, शासनाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांनी २५ रुपये प्रति किलो दराची मागणी कायम ठेवत बाजार समित्यांमधून थेट २५ रुपये दराने कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे. वाढीव दर आणि अटी शिथिल करूनही शेतकरी समाधानी झालेले नाहीत. त्यामुळे कांदा खरेदी धोरणावर शेतकऱ्यांनी सरकारकडे पुन्हा नवा आग्रह धरला असून कांदा प्रश्नावर शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!