AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!

स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने एक कविता म्हणून दाखवलीय. या कवितेत तीने अप्रत्यक्षपणे सध्याच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलंय.

'आमचं इथे व्यवस्थित चाललंय', CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!
spruha joshiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 10:11 PM
Share

Spruha Joshi Poem : सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची देशभरात चर्चा होत आहे. या आंदोलात देशातील हजारो तरुण सहभागी झाले आहेत. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे, नीट पेपर फुटीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी काही मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत. सोबतच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत दिल्लीतील जंतर-मंतरचे मैदान सोडणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीही पुढे येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिनेदेखील कवितेच्या माध्यमातून सीजेपीच्या या आंदोलना पाठिंबा दिलाय.

स्पृहा जोशीच्या कवितेची चर्चा

स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने एक कविता म्हणून दाखवलीय. या कवितेत तीने अप्रत्यक्षपणे सध्याच्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य केलंय. तिने या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सोबतच डिसक्लेमर म्हणून “या कवितेचा कोणत्याही जीवित , मृत .. मृत होऊ घातलेल्या, अथवा आतून मृत झालेल्या व्यक्ती, संवेदनशीलता वा लोकशाहीशी पूर्ण संबंध आहे!” असं म्हटलंय.

स्पृहा जोशीच्या कवितेत काय आहे?

स्पृहा जोशीने तिच्या कवितेला आक्रंदन असं नाव दिलंय.

आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय संवदेनाहीन कोशात आम्ही स्वत:ला गुरफटलंय. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय रोजच उठून चालू आहे निष्पापांचं आक्रंदन, घुसमटणाऱ्या श्वासांचं रोजचंच आहे मुक रुदण, बोलू पाहणाऱ्या आवाजाला आम्ही कधीच गप्प केलंय, किती बॉम्बस्फोट, किती दंगली माणसं मरतायत मरू दे, आपण त्यात नव्हतो ना, चला आजची रात्र टळू दे, उपोषणं होतात, मोर्चे निघतात, झुरळं चक्क रस्त्यावर उतरतात मत, विरोध, धर्म, अजेंडा चर्चा बिर्चा नकोच काही मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले हे तर नुसते देशद्रोही निर्लज्जपणे आम्ही स्वत:ला ठासून सांगितलंय संवदेनाहीन कोशात आम्ही स्वत:ला गुरफटलंय.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

अशी कविता स्पृहा जोशीने पोस्ट केलीय. तिच्या या पोस्टमुळे अनेकजण तिचे कौतुक करत आहेत.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी