AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला आहे. अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराण देखील या हल्ल्यांना उत्तर देत आहे. त्यामध्येच आता इराणकडून अमेरिकेच्या लष्कर तळावर मोठा हल्ला करण्यात आला.

इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला, तेल भडकल, भारतावर संकट
Iran and US war
| Updated on: Jul 21, 2026 | 10:27 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा आखाती देशात तणाव बघायला मिळतोय. अमेरिका मोठे हल्ले इराणवर करत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. इराण देखील अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर देत आहे. इराणी सैन्याने मंगळवारी पहाटे कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. हे भीषण हल्ले होते. अमेरिका गेल्या 10 दिवसांपासून सतत इराणवर हल्ले करत आहे. मात्र, तरीही इराण मागे हटताना दिसत नाहीये. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे भाव जागतिक बाजारात सतत वाढत आहेत. आजही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. इराणी सैन्याने मंगळवारी पहाटे सांगितले की, त्यांनी कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव प्रचंड वाढताना दिसत आहे.

भारतावर गंभीर परिणाम

इराण आणि अमेरिका युद्ध पेटल्यानंतर इराणकडून पुन्हा एकदा होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने थेट भारतावर परिणाम होतोय. भारतात एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा होर्मुज खाडीतूनच होतो. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात कच्चे तेल आणि एलपीजीची समस्या आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाली. देशात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात चार वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. त्यामध्येच आताही सरकार याबाबत घोषणा करू शकते.

इराण आणि अमेरिका युद्धात 1 महिन्यात तब्बल 20 टक्के जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. दरम्यान, WTI कच्च्या तेलाच्या दरात 0.9 टक्क्यांनी वाढ होऊन ते प्रति बॅरल 83.23 डॉलरवर पोहोचले. आता युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. याचे परिणाम भारतात स्पष्टपणे दिसतील.

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला 

इराणचे राष्ट्रापती मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले की, या संघर्षाचे रूपांतर आता पूर्ण प्रमाण युद्धात झाले आहे.  कुवेतमधील आरिफजान तळावर तैनात असलेल्या अमेरिकेच्या दहशतवादी सैन्याच्या हायमार्स क्षेपणास्त्र प्रणालींना जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राव्दारे टार्गेट करत हल्ला केला.

इराणचे अमेरिकेच्या लष्कर तळावर मोठे हल्ले 

हायमार्स हे जमिनीवरील हल्ला करणारे क्षमता असलेले फिरते क्षेपणास्त्र आहे. अचूक निशाणा साधण्यासाठी त्याची खास ओळख आहे. शत्रूचे मोठे नुकसान होते. आक्रमक कारवायांमध्ये शत्रूची क्षेपणास्त्र क्षमता कमी होते, असेही त्यांनी म्हटले.  कुवेत शहराच्या दक्षिणेस स्थित असलेल्या कॅम्प आरिफजानमध्ये अमेरिकेचे हवाई दल, नौदल, मरीन कॉर्प्स आणि कोस्ट गार्ड तैनात आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार