AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 सोन्याचे कलश, 45 किलो चांदी… हवेलीत सापडला अचानक खजिना, नेमकं कुठे घडलं?

एका वडिलोपार्जित हवेलीत उत्खननादरम्यान कोट्यवधी रुपयांचा खजिना (सोन्याचे कलश आणि चांदी) सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी एका कंत्राटदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदारावर खजिना लपवल्याचा आरोप असून, पोलीस व्हिडीओ पुराव्याची तपासणी करत आहेत.

15 सोन्याचे कलश, 45 किलो चांदी... हवेलीत सापडला अचानक खजिना, नेमकं कुठे घडलं?
Hidden TreasureImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 20, 2026 | 2:44 PM
Share

कल्पना करा जर तुमच्या घरात तुमच्या पणजोबांनी किंवा त्या आधीच्या पिढीने लपवून ठेवलेला खजिना अचानक सापडला तर. अशीच एक घटना समोर आली आहे. एका जुन्या हवेलीमधून कोट्यवधी रुपयांचा खजिना सापडला आहे. हा खजिना हवेलीच्या मालकाने गायब झाल्याची तक्रार केल्यानंतर समोर आला आहे. आता नेमकं काय झालं होतं जाणून घ्या…

ही घटना राजस्थानातील जयपुरमधून समोर आली आहे. त्रिपोलिया बाजारातील विद्याधरचा रस्ता भागात एका हवेलीत कोट्यवधी रुपयांचा खजिना मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. हवेली मालकाने ठेकेदारावर सोने-चांदी आणि जुने नाणे गायब केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सेठी परिवाराचा व्यापारी इतिहास आणि स्थानिकांच्या दाव्यांमुळे ही घटना अधिक रंजक बनली आहे.

हवेलीचे मालक राहुल सेठी यांनी माणकचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, हवेलीच्या खोदकामादरम्यान सुमारे ४० ते ४५ किलो चांदीचा स्लॅब्स, सोन्याच्या नाण्यांनी भरलेले १४ ते १५ कलश आणि ८ ते १० हजार जुनी चांदीची नाणी मिळाली. ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांनी हे सर्व आपसात वाटून घेतल्याचा आरोप आहे. राहुल सेठी यांनी पोलिसांना सांगितले की, बांधकाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, खोदकामात कोणतीही मौल्यवान वस्तू मिळाली तर ती कुटुंबाला सुपूर्द करावी. नंतर एक कामगाराने संपूर्ण प्रकरण उघड केले. दोन व्हिडीओही मिळाले असून ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

स्थानिकांच्या मते…

स्थानिक रहिवासी अमित यांनी सांगितले की, “ही जुनी हवेली आमच्या समोरच होती. सव्वा वर्षापूर्वी ती पाडण्यात आली. तेव्हापासून खोदकामात खजाना मिळाल्याच्या चर्चा सुरू आहेत. बद्रीनारायण सेठी खूप श्रीमंत होते, म्हणून लोकांना वाटते की हवेलीत जुना खजिना असू शकतो.” स्थानिक दुकानदार राजा रामचंदानी म्हणाले, “सव्वा वर्षापूर्वी हवेली पाडण्याचे काम सुरू झाले तेव्हा लोक चर्चा करत होते की, इथे सोने-चांदी मिळेल. राहुल सेठी यांनी तेव्हा तपासणीही केली होती आणि काही खजिना मालकाला मिळाल्याची चर्चा होती. आता ऐकायला येत आहे की, ठेकेदाराने खजिना बळकावला आहे. पण खजिना मिळाला असेल तर तो हवेली मालकाचाच आहे.”

सेठी परिवाराचा इतिहास

स्थानिकांच्या माहितीनुसार, राहुल सेठी यांचे आजोबा बद्रीनारायण सेठी १९७० च्या दशकात जयपुर आणि मुंबईतील मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये गणले जात होते. मुंबईत त्यांचा ‘जीडी मावा वाला अँड कंपनी’ नावाचा मोठा मिठाईचा व्यवसाय होता. सेठी परिवाराची श्रीमंती संपूर्ण शहरात प्रसिद्ध होती. बद्रीनारायण सेठी यांचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पत्नीपासून दुर्गालाल सेठी आणि दुसऱ्या पत्नीपासून घनश्याम सेठी. घनश्याम सेठी यांचे पुत्र तरुण सेठी आणि राहुल सेठी आहेत. हे कुटुंब जुन्या जयपुरमधील प्रतिष्ठित व्यापारी परिवारांपैकी एक मानले जाते.

आजही अनेक प्राचीन हवेल्या

विद्याधरचा रस्ता हा जयपुरातील सर्वात जुना आणि ऐतिहासिक भाग आहे. येथे आजही अनेक प्राचीन हवेल्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे या कथित खजिन्याच्या चर्चा पूर्ण परिसरात रंगल्या आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही सरकारी यंत्रणेने खजिना मिळाल्याची पुष्टी केलेली नाही.

Follow Us
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत...
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
Kolhapur Protest | दिल्ली आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद! कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर.

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग...

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..