Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनपर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी दिली. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला.
दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनपर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी दिली. यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. हे आंदोलन नीट पेपरफुटी प्रकरणी केलं जात आहे.
वाद वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. आंदोलकांना रोखण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या दृष्टीने जंतरमंतर आणि आसपासच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घडामोडी सुरू असतानाच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना झाले. धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 20, 2026 01:37 PM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

