AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?

CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?

| Updated on: Jul 20, 2026 | 2:22 PM
Share

दिल्लीतील संसद भवन परिसरात कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनाने मोठे नाट्यमय वळण घेतले आहे. आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व पातळीवर वाढवण्यात आली असून, संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद करण्यात आले आहे. संसद भवनाच्या दिशेने मोर्चा घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला. सध्या आंदोलक रेल्वे भवन परिसरात धरणे आंदोलन करत असून, परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमध्येही महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद भवनात भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, सरकारने CJP प्रतिनिधींनाही चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीचे आशुतोष रांका आणि सौरभ दास हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. CJP चा दावा आहे की, सरकारने सकाळीच चर्चेसाठी संपर्क साधला होता.

यापूर्वी जंतरमंतरवरून संसदेकडे निघालेल्या मोर्चाला रोखताना दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहितीही समोर आली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आधीच राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली असून, नवी दिल्ली परिसरात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान, CJP च्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा मिळत आहे. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, संजय सिंह, आजाद समाज पार्टीचे प्रमुख तथा खासदार चंद्रशेखर आझाद, अभिनेते प्रकाश राज तसेच सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसद असा मोर्चा काढण्याचे आवाहन CJP कडून करण्यात आले होते.

Published on: Jul 20, 2026 02:22 PM

Follow Us
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग...

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..

FIFA World Cup 2026: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून इटलीचा विक्रम मोडला.

FIFA World Cup 2026: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून इटलीचा विक्रम मोडला

Rohit Sharma: टी-शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स घालून, तोंड लपवून ट्रेननं करावा लागला प्रवास, शतकानंतर रोहितवर अशी वेळ का ओढवली?.

Rohit Sharma: टी-शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स घालून, तोंड लपवून ट्रेननं करावा लागला प्रवास, शतकानंतर रोहितवर अशी वेळ का ओढवली?