AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत

Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत

| Updated on: Jul 20, 2026 | 12:43 PM
Share

समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे.

समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर इथेनॉल घेऊन जाणारा टँकर उलटल्याने काही काळ वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्याचदरम्यान विरुळ गावाजवळ भरधाव मालवाहू वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. हे वाहन समोरून येणाऱ्या कारवर जाऊन आदळले. धडक इतकी जोरदार होती की कारने काही क्षणांत पेट घेतला. आगीने संपूर्ण कार वेढल्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

या भीषण आगीत कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मालवाहू वाहनातील 1 व्यक्तीचाही मृत्यू झाला. अन्य 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 20, 2026 12:32 PM

Follow Us
Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले.

Jantar Mantar Protest: लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या, आंदोलक संसद भवन परिसरात पोहोचले

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम.

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार, जंतरमंतरवरचं आंदोलन पेटलं, मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

ममता बॅनर्जी यांना कोर्टाकडून मोठा दणका, दिलासा नाहीच, तब्बल 440 करोड...

ममता बॅनर्जी यांना कोर्टाकडून मोठा दणका, दिलासा नाहीच, तब्बल 440 करोड..

Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान...

Parliament Monsoon Session 2026 : एका महिन्यात देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, प्रत्येक भारतीयाला अभिमान, नरेंद्र मोदींचे मोठे विधान..

माझ्यामुळेच TRP वाढतोय असा माज..; ‘रात्रीस खेळ चाले’च्या ‘शेवंता’ने अपूर्वा नेमळेकरला सुनावलं.

माझ्यामुळेच TRP वाढतोय असा माज..; ‘रात्रीस खेळ चाले’च्या ‘शेवंता’ने अपूर्वा नेमळेकरला सुनावलं

IND vs ENG: राजाचा थाटच निराळा, शतकानंतर ना हेल्मेट काढलं, ना उडी मारली, फक्त बॅट पुढे केली अन् नंतर…सेलिब्रेशनचा Video चर्चेत.

IND vs ENG: राजाचा थाटच निराळा, शतकानंतर ना हेल्मेट काढलं, ना उडी मारली, फक्त बॅट पुढे केली अन् नंतर…सेलिब्रेशनचा Video चर्चेत