AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचले आहेत. संसद भवन परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसद भवनाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं
| Updated on: Jul 20, 2026 | 1:47 PM
Share

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचले आहेत. या आंदोलक आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. आंदोलक रेल्वे भवनजवळ धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी दाखल झाल्याचे समोर आले आहे.

संसद भवनात धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांची भेट सुरू आहे. CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे, सरकारनेही CJP नेत्यांना भेटीसाठी बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीतर्फे आशुतोष रांका आणि सौरभ दास हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. CJP चा दावा आहे की, सरकारने सकाळीच बोलणी करण्यासाठी संपर्क साधला होता.

पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता

यापूर्वी जेव्हा आंदोलक जंतर-मंतरवरून संसदेच्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. संसदेच्या मानसून अधिवेशन आणि CJP च्या संसद मार्चला लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी राजधानीत आधीच सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. नवी दिल्लीत BNS कलम १६३ लागू करण्यात आले होते. CJP च्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया, संजय सिंह, आजाद समाज पार्टीचे प्रमुख आणि यूपीचे नगीना मतदारसंघाचे सांसद चंद्रशेखर यांच्यासह अभिनेते प्रकाश राज आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली देखील उपस्थित होत्या. CJP ने २० जुलै रोजी जंतर-मंतर ते संसद असा मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते.

युवकांवर अन्याय होत आहे – चंद्रशेखर आझाद

आझाद समाज पार्टी (कांशी राम)चे प्रमुख आणि संसद चंद्रशेखर आजाद यांनी म्हटले की, “सरकार आपला ‘धर्म’ बजावत आहे, पोलिस आपला ‘धर्म’ बजावत आहेत आणि मी या मातीच्या प्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी या संघर्षाचा भाग बनलो आहे. एक भारतीय युवक म्हणून मी युवकांच्या वेदना समजतो. त्यांच्यासोबत उभे राहण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि सरकार याला होऊ देत आहे.”

Follow Us
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...
सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
Suresh Dhas | सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण