संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद; काय म्हणाले?
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधत अधिवेशन हे फायदेशीर ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली. याचवेळी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधत अधिवेशन हे फायदेशीर ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली. याचवेळी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मान्सून आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्ही सक्रिय राहिले तर देशाच्या विकासाला गती मिळते. या अधिवेशनातून जनतेच्या हिताचे निर्णय होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच देशाने गेल्या 1 महिन्यात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठल्याचे सांगत भारताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले.
यावेळी त्यांनी भारतीय तरुणांच्या क्षमतेचेही कौतुक केले. भारतीय नागरिकाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील यशस्वी मोहिमेचा आणि एका भारतीय स्टार्टअपच्या उल्लेखातून देशातील नवकल्पना व तरुणांच्या स्वप्नांचा गौरव केला.
दरम्यान, संसद परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातील काही आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परवानगी नसतानाही मोर्चा पुढे सरकल्याने पोलिसांनी आंदोलकांना रोखले. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे.
Published on: Jul 20, 2026 11:30 AM
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...

