AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीजेपीचं शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला, सौरभ दास आणि आशुतोष रांका भूमिका मांडणार

Jantar Mantar Protest: दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडल्याचे समोर आले आहे.

सीजेपीचं शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला, सौरभ दास आणि आशुतोष रांका भूमिका मांडणार
CJPImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 20, 2026 | 1:27 PM
Share

दिल्लीत जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होते. हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडले आहे. तर दुसरीकडे, CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी संपर्क साधला आहे. ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आज कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसदेकडे मोर्चा काढला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली आहे. तरीही जंतर-मंतर येथे सुमारे १० हजारांवर कार्यकर्ते जमले. पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता. संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट

या आंदोलनात CJP चे संस्थापक अभिजीत दीपके सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, काहीच वेळात अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडले. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी झालेल्या भेटीमुळेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर विविध स्तरांवर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही

यासंदर्भात CJP कडून सोशल मीडियावर एक पोस्टही करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?