AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत भांडी घासून काढले दिवस, पत्नीच्या पैशांवर चालवायचा घर, आज हाच अभिनेता कोट्यवधींचा मालक

बॉलिवूडमधील हा अभिनेता घरात भांडी घासत होता. पत्नीच्या पगारामुळे चालत होते घर. पण अभिनेत्याने शेवटपर्यंत अभिनय सोडला नाही. आज हाच अभिनेता लाखो चाहत्यांच्या मनावर करतोय राज्य. आहे कोट्यवधींचा मालक.

मुंबईत भांडी घासून काढले दिवस, पत्नीच्या पैशांवर चालवायचा घर, आज हाच अभिनेता कोट्यवधींचा मालक
| Updated on: Jul 20, 2026 | 1:37 PM
Share

बॉलिवूडमध्ये आज दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठीचा यशाचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच संघर्षमयही आहे. आज कोट्यवधी रुपयांची संपत्ती, मोठे चित्रपट आणि वेब सिरीज त्याच्या नावावर असल्या तरी एक काळ असा होता, जेव्हा मुंबईत छोट्याशा खोलीत राहून त्याने दिवस काढले. त्या कठीण काळात घराचा संपूर्ण खर्च त्याच्या पत्नी मृदुला त्रिपाठी यांच्या पगारावर चालत होता, तर पंकज घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत अभिनयाच्या संधींचा शोध घेत होते.

मुंबईत आल्यानंतर अनेक वर्षे पंकज त्रिपाठीला चित्रपटांमध्ये मोठी संधी मिळाली नाही. ऑडिशनसाठी सतत धावपळ, अनिश्चित भविष्य आणि आर्थिक अडचणीचा सामना करत असतानाही त्याने अभिनयाचे स्वप्न सोडले नाही. मृदुला शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या आणि त्यांच्या पगारातून घरखर्च भागत होता. दरम्यान, पंकज घरातील स्वयंपाक, भांडी, साफसफाई आणि इतर कामे सांभाळत होते. कुटुंबातील एकमेकांच्या सहकार्यामुळेच कठीण काळावर मात करता आली, असे दोघेही अनेक मुलाखतींमध्ये सांगतात.

एका मुलाखतीत पंकज त्रिपाठीने सांगितले होते की, 2004 ते 2010 या काळात त्याचे उत्पन्न अत्यंत मर्यादित होते. अनेकदा कामच नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्या काळात पत्नीची कमाईच कुटुंबासाठी मोठा आधार ठरली. घरातील जबाबदाऱ्या वाटून घेण्यात कोणताही कमीपणा नसतो, उलट कुटुंब एकमेकांच्या सहकार्यानेच पुढे जात असते असेही त्याने स्पष्टपणे नमूद केले होते.

पंकज त्रिपाठीची संपत्ती किती?

यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही पंकज त्रिपाठीने आपली साधी राहणी आणि गावाशी असलेले नाते कायम जपले आहे. मुंबईतील आलिशान घरात राहत असूनही त्याने आपल्या घरात गावाची ओळख जपणाऱ्या चारपाई (खाट) आणि मातीच्या भांड्यांसारख्या वस्तूंना स्थान दिले आहे. बिहारमधील त्याचे पुश्तैनी घर आजही त्याच्या हृदयाच्या जवळ असून, यश मिळाल्यानंतरही आपल्या मुळांचा विसर पडू नये असा त्याचा ठाम विश्वास आहे.

माध्यमांतील अहवालानुसार, पंकज त्रिपाठीची एकूण संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो 3 ते 4 कोटी रुपये मानधन घेतो. मात्र, प्रसिद्धी आणि आर्थिक यश मिळाल्यानंतरही त्याचा साधेपणा, नम्र स्वभाव आणि जमिनीशी जोडलेली जीवनशैली कायम आहे. संघर्ष, संयम, मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्याच्या जोरावर अशक्य वाटणारी स्वप्नेही पूर्ण करता येतात हे पंकज त्रिपाठीच्या प्रवासातून अधोरेखित होते.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?