AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला मोर्चात जायचंय, डिस्चार्ज करा, सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र

सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून ते दिल्लीतील जंतर मंतर येथील NEET गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनात सहभागी होऊ शकतील. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असले तरी, वांगचुक यांनी संसदेकडे कूच करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे.

मला मोर्चात जायचंय, डिस्चार्ज करा, सोनम वांगचुक यांचं रुग्णालयाला पत्र
| Updated on: Jul 20, 2026 | 1:22 PM
Share

नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते यांना शनिवारी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता सोनम वांगचुक यांनी मोठी मागणी केली आहे. “मला संसदेकडे कूच करायचे आहे; कृपया मला डिस्चार्ज द्यावा.” अशी मागणी वांगचुक यांनी रुग्णालयाला पत्र लिहून केली आहे. दरम्यान , जर सोनम वांगचुक यांना दोन तासांच्या आत जंतरमंतरवर आणले नाही, तर ते संसदेच्या दिशेने मोर्चा काढतील, अस इशारा कॉक्रोच जनचा पक्षाचे सस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला आहे.सोनम वांगचुक हे सध्या सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. “माझं आरोग्य पूर्णपणे चांगलं असून सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आहेत. त्यामुळे किमान तात्पुरती तरी मला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात यावा, जेणेकरून संसदेवर निघालेल्या मोर्चात सहभागी होता येईल,” अशी विनंती वांगचुक यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे. यासाठी त्यांनी स्वतः पत्र लिहून ते रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केलं.

तसेच त्यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं असून वांगचुक यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही तीव्र प्रश्न उपस्थित केले. “माझी प्रकृती उत्तम आहे. पोलिसांकडून मला ताब्यात घेतलेलं नसल्याचा दावा केला जात आहे. जर मी ताब्यात नसेन, तर माझ्या हालचालींवर निर्बंध का घातले जात आहेत?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला. X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर त्यांनी हे पत्र पोस्ट केलं आहे.

तर दुसरीकडे CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने एक ट्विटही केलं आहे. ‘मामला शिक्षा मंत्री का, बात स्वास्थ्य मंत्री करेंगे’ असं CJPचं ट्विटं आहे.

अभिजीत दिपके यांनी सोडलं उपोषण

शनिवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर CJPचे संस्थाप अभिजीत दिपके यांनी आक्रमक भूमिका घेत, सोनम वांगचुक यांच्या जागी आपण आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर केलं. गेल्या तीन दिवसांपासून उपोषण केल्यानंतर , अखेर आज दिपके यांनी आज त्यांचं उपोषण सोडलं.

सकाळी जंतरमंतरवर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

काल रात्रीपासून जंतरमंतर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलक जमण्यास सुरूवात झाली. आज सकाळी 10 वाजता जंतर-मंतर येथे पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या निदर्शकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले आणि काहींच्या डोक्यालाही दुखापत झाली. मात्र, पोलिसांनी हे वृत्त फेटाळले आहे. जंतर-मंतर ते संसद भवन या २ किलोमीटरच्या पट्ट्यात केवळ आंदोलकच दिसत होते. या आंदोलनादरम्यान, आंदोलक राजीव चौक आणि मंडी हाऊस मेट्रो स्थानकांमध्ये घुसले. अनेकांनी तर बॅरिकेड्स तोडून संसद पोलीस ठाण्यापर्यंत मजल मारली; त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं