AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला

कॉक्रोच जनता पक्षाचा 'संसद मार्च' लवकरच संसदेवर धडकण्याची शक्यता आहे.या मोर्चादरम्यान अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं आहे.

मोठी बातमी! अभिजीत दीपके यांनी उपोषण सोडलं, शिष्टमंडळ नड्डा यांच्या भेटीला
| Updated on: Jul 20, 2026 | 1:38 PM
Share

कॉक्रोच जनता पक्षाचा ‘संसद मार्च’ लवकरच संसदेवर धडकण्याची शक्यता आहे. कॉक्रोज जनता पार्टीच्या मार्चमध्ये हजारो तरुण सहभागी झाले आहेत. एक-एक करत सर्व तरुण संसदेच्या दिशेने आगेकुच करत आहेत. तरुणांकडून सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी केली जात आहे. कॉक्रोच जनता पक्षाच्या मार्चचे संसदेतही पडसाद उमटले आहेत. ‘मार्च’वरून वातावरण तापल्याने लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. आता या मार्चदरम्यान अभीजीत दीपके यांच्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर उपोषण सोडलं. त्याचबरोबर कॉक्रोच जनता पक्षाचे शिष्टमंडळ देखील मंत्री जे.पी. नड्डा यांच्या भेटीला गेले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. त्यावेळी सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपके यांना उपोषण सोडण्याचा संदेश दिला. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांनी वांगचुक यांच्या विनंतीची घोषणा केली. आंदोलन सुरू ठेवण्यासाठी शरीरात ताकद असायला हवी, असं म्हणत त्यांनी विनंती केली. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी ज्युस पिऊन उपोषण सोडलं.कॉक्रोच जनता पार्टीचे सौरभ दास यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘सकाळचे 11.52 वाजले आहेत. मी आणि आशुतोष रांका हे जे.पी. नड्डा यांना भेटायला निघालो आहे. सरकारने चर्चेसाठी संपर्क साधला होता. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. तरुण मोठ्या संख्येने जमले आहेत’.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतरही त्यांनी रुग्णालयात उपोषण सुरु ठेवलं आहे. त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर अभिजीत दीपके यांनी उपोषणाची घोषणा केली होती. परंतु दीपके यांनी आज उपोषण सोडलं. तर सोनम वांगचुक हे 21 दिवसानंतरही उपोषणावर ठाम आहेत. दुसरीकडे आंदोलक संसदेकडे निघाले आहेत. त्यामुळे संसदेचा मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे. तर पोलिसांनी आंदोलकावर अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या आहेत.  त्यामुळे नवी दिल्लीत वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?