AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज अन्...

अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज अन्…

| Updated on: Jul 20, 2026 | 11:07 AM
Share

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनाने मोठं रुप घेतलंय. संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हजारोंच्या संख्येने आंदोलक जंतर-मंतर परिसरात जमले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संसद परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून काही मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. तसेच इंटरनेट सेवांवरही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी हे आंदेलन सुरु आहे. कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीकडून काही मागण्याही करण्यात येत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील हालचालींवर लक्ष ठेवले आहे. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे.

Published on: Jul 20, 2026 11:07 AM

Follow Us