मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच… बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
धाराशिवमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांपासून ते 'ऑपरेशन टायगर', शिवसेनेतील घडामोडी आणि तुळजाभवानी मंदिर विकासकामांबाबत भूमिका स्पष्ट केली.
धाराशिवमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांपासून ते ‘ऑपरेशन टायगर’, शिवसेनेतील घडामोडी आणि तुळजाभवानी मंदिर विकासकामांबाबत भूमिका स्पष्ट केली.
योगेश कदम म्हणाले की, FDA च्या कारवाया अधिक प्रभावी होण्यासाठी कायद्यात बदल आवश्यक आहेत. याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या विषयावर लक्ष ठेवून आहेत. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ऑपरेशन टायगर’ थांबलेले नाही आणि पुढेही सुरू राहील, असा दावा करत त्यांनी उबाठा गटातील कार्यकर्ते, नेते आणि लोकप्रतिनिधी स्वतःहून संपर्क साधत असल्याचे म्हटले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकांकडून व्यक्त होत असल्याचा दावा त्यांनी केला.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी शिवसेनेच्या घटनेकडे दुर्लक्ष आणि जवळच्या लोकांवरील अतिविश्वासामुळे पक्षाला फटका बसल्याचे म्हटले. तसेच 6 खासदारांचे विलीनीकरण कायदेशीर प्रक्रियेनुसारच झाल्याचा दावाही त्यांनी केला.
Published on: Jul 20, 2026 11:56 AM
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....

