AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma: तर तशी मजा राहिली नाही…अखेर रोहितने रिटायरमेंटच्या चर्चांवर मौन सोडलं, जे बोलला ते तुमच्याही हृदयाला भिडेल, Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका रंगली जी इंग्लंडने जिंकली, आता या मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी खेळली आणि सर्वांचे तोंड बंद केले आहे. पण आता यानंतर आता रोहितने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर आपले मौन सोडले आहे.

Rohit Sharma: तर तशी मजा राहिली नाही...अखेर रोहितने रिटायरमेंटच्या चर्चांवर मौन सोडलं, जे बोलला ते तुमच्याही हृदयाला भिडेल, Video Viral
rohit sharma
| Updated on: Jul 20, 2026 | 1:23 PM
Share

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका आणि वनडे मालिका पार पडली. दोन्ही मालिका इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली पाहायला मिळाली नाही. संघात वारंवार होणारे अनेक बदलांमुळे आता निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागत नाही. अशातच काही अनुभवी खेळाडूही निवृत्त करण्याच्या तयारीत बीसीसीआय असंही म्हटलं जात होत. विशेषत: रोहित शर्मा निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा रंगलेली दिसली. लॉर्ड्सच्या मैदानावर रोहितने फक्त शतक ठोकले नाही तर त्यासोबत अनेकांची तोंडही बंद केली आहेत. रोहितच्या शतकी खेळीनंतर आता त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवरही पूर्णविराम बसला आहे. रोहितने आता निवृत्तीच्या चर्चांवर आपले परखड मत मांडले आहे.

रोहितने म्हटले आहे की, “जोपर्यंत मी खेळत राहील, तोपर्यंत हे सुरूच राहील. सध्या माझे लक्ष चांगला क्रिकेट खेळण्यावर आहे, मैदानावर बॅटने धावा करणे हे माझे काम आहे. माझ्या देशाचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे काम आहे. जेव्हापासून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून मला हेच करण्यास सांगितले गेले आहे आणि मी ते करत राहीन. माझ्या पदार्पणापासून माझ्या निवृत्तीबद्दल आणि फॉर्मबद्दल चर्चा होत आहे आणि जोपर्यंत मी येथे क्रिकेट खेळत राहीन, तोपर्यंत या चर्चा सुरूच राहतील. त्यामुळे, या गोष्टींचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही.”

रोहित पुढे म्हणाला की, मी मैदानावर काय करतो आणि संघाच्या विजयासाठी मी किती योगदान देऊ शकतो, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. सध्या माझं संपूर्ण लक्ष त्यावरच आहे. बाहेरच्या गदारोळाबद्दल बोलायचं झालं तर, त्याला राहू द्या, कारण जर गदारोळच नसेल, तर मजा राहणार नाही. माझं काम मैदानावर खेळणं आहे आणि बाहेरच्या लोकांचं काम अफवा पसरवणं आहे, मी याकडे असंच पाहतो.”

रोहितने कोहलीसोबतच्या बॉन्डवरही सांगितले. तो म्हणाला की, “आम्ही आमच्या संपूर्ण कारकिर्दीत एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे विराटसोबत मैदानावर असणं खूप छान वाटतं. आमच्या अनेक उत्तम भागीदारी झाल्या आहेत आणि एकत्र फलंदाजी करताना नेहमीच मजा येते. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. मैदानावर नवीन कल्पनांची देवाणघेवाण करणे आणि संघासाठी आपण आणखी काय चांगलं करू शकतो याचा विचार करणे, हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो.”

Follow Us
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवलं
मोठी बातमी! अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतर मैदानातून हटवलं
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा..
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा स्थगित तर लोकसभा...
धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?.

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!.

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?.

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?

डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं….

डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं…

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?.

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ.

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ