AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: राजाचा थाटच निराळा, शतकानंतर ना हेल्मेट काढलं, ना उडी मारली, फक्त बॅट पुढे केली अन् नंतर…सेलिब्रेशनचा Video चर्चेत

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका पार पडली ज्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यात एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे रोहित शर्माने शतक झळकावलेले. रोहितने शतक झळकावल्यानंतर जे केले त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. या कृतीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

IND vs ENG: राजाचा थाटच निराळा, शतकानंतर ना हेल्मेट काढलं, ना उडी मारली, फक्त बॅट पुढे केली अन् नंतर...सेलिब्रेशनचा Video चर्चेत
rohit shrama flying kiss to ritika
| Updated on: Jul 20, 2026 | 12:00 PM
Share

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे, टी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही 1-2 ने गमावली. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शानदार 138 धावा केल्या. आपल्या शतकादरम्यान रोहितने 17 चौकार आणि पाच षटकार मारले. रोहितचा लॉर्ड्सवरील सामना हा शेवटचा सामना असणार आहे असं म्हटले जात होते. हा सामना खेळून तो आपली निवृत्ती जाहीर केली अशी चर्चा ही रंगली होती. यामागे रोहितचा खराब फॉर्म जबाबदार असल्याचे समोर आले होते. पण सगळ चित्रच पलटलं. रोहितने तर मैदान गाजवलं, त्याने दमदार शतकी खेळी खेळली. आता या शतकानंतर त्याची रिॲक्शन आता व्हायरल होत आहे. रोहितचा असा अंदाज आधी कधीच पाहिला नसेल. रोहितच्या रिॲक्शनचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसले.

रोहितच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू रोहित शर्माने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी रितिकाही तिथे उपस्थित होती. जेव्हा रोहितने आपले शतक पूर्ण केले, तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. रितिकाही तिथे उपस्थित होती. रितिका डोळे पुसताना दिसली. शतक पूर्ण केल्यानंतर रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि रोहितने मैदानाच्या मधून तिला फ्लाइंग किस दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, रोहित शर्माने आपले शतक कोणत्याही विशेष पद्धतीने साजरे केले नाही. त्याच्या शतकाच्या वेळी भारतीय संघ लक्ष्यापासून खूप दूर होता. रोहितने शतक केले पण त्याचा काही विशेष फायदा झाला नाही.

रोहितच्या अविस्मरणीय खेळीनेही भारतीय संघाला विजय मिळवून देता आला नाही. इंग्लंडने दिलेल्या 388 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 7 गडी गमावून केवळ 360 धावाच करता आल्या. रोहित व्यतिरिक्त, शुभमन गिलने भारतासाठी 77 धावा केल्या, तर कोहलीने 60 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. सामना गमावण्यासोबतच भारतीय संघाने मालिकाही गमावली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. इंग्लंडने दुसरा आणि तिसरा सामना जिंकला.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम