AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !

प्रवासात अनेकदा आपल्याकडे मोबाईलचा चार्जिंग संपल्यास संपर्क तुटण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेकजण रेल्वे स्थानक, विमानतळ, एसटी स्थानक, दुकानात सार्वजनिक चार्जिंग पॉईंटवर आपला मोबाईल फोन चार्जिंगला लावतात. मात्र,त्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

प्रवासात येथे फोन चार्ज करताय, पडू शकते महागात, खाली होऊ शकते तुमचे बँक खाते !
public mobile charging point
| Updated on: Jul 20, 2026 | 10:22 PM
Share

मोबाईल चार्जिंगची समस्या प्रवासात सर्वाधिक भेडसावत असते. त्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासी प्रवासात पर्सनल चार्जर, केबल वा पॉवर बँक सोबत बाळगत नाहीत. त्यामुळे प्रवासात मोबाईल चार्जिंग एक मोठी समस्या ठरत असते. यामुळे एअरपोर्ट, रेल्वे स्थानक वा अन्य पब्लिक जागांवर उपस्थित असलेल्या चार्जिंग स्टेशनचा वापर नाईलाजाने प्रवाशांना करावा लागतो. मात्र, असे केल्याने तुमच्या मोबाईलचा डाटा आणि तसेच बँक अकाऊंट खाली होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला ठेवणे धोकादायक ठरु शकते.

मोबाईल फोनची बॅटरी नेहमीच संपते, त्यावेळी अनेकदा चार्जिंगसाठी पॉवर बँक नसल्याने प्रवासी कोणत्याही चार्जिंग पॉवर सेंटरवर मोबाईल फोन चार्जिंगला ठेवून देतात. त्यामुळे मात्र तुमची प्रायव्हसी तर भंग होतेच शिवाय या एका चुकीमुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामे देखील होऊ शकते. अनेकदा फोनला हँकींग आणि ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार देखील घडू शकतात.

या चार्जिंग पॉईंटसवर अनेकदा अनोळखी लोक देखील आपले फोन चार्ज करत असतात. सार्वजनिक जागी फोन चार्जिंग केल्याने हॅकर तुमच्या स्मार्टफोनमध्ये शिरकाव करीत तुमची पर्सनल माहिती आणि बँक अकाऊंटचे डिटेल्स चोरु शकतात. किंवा खतरनाक व्हायरस देखील पाठवू शकतात. युएसबी पोर्टमध्ये हॅकिंग डिव्हाईस देखील लावू शकतात. त्यामुळे सार्वजनिक स्थळावर मोबाईल चार्जिंग करण्याची चूक तुम्ही करत असाल तर आजच सावध होऊन जा..

चार्जिंगसाठी ज्या युएसबी केबलचा वापर केला जातो. तो केवळ बॅटरी चार्ज करत नाही तर डेटा देखील ट्रान्सफर करतो. त्यामुळे जर पब्लिक चार्जिंग स्टेशनवर फोन लावल्यानंतर तुमच्या फोनमध्ये Allow this device वा कोणत्या पद्धतीचा डेटा एक्सेसवाला पॉप अप येत असेल तर लागलीच सावधान व्हा.याचा अर्थ ते चार्जिंग स्टेशन सुरक्षित नाही. अशा स्थितीत कोणतीही परमिशन देऊ नका. म्हणजे तुमचा डेटा आणि बँक अकाऊंट सुरक्षित राहील.

या स्कॅम्सपासून कसा बचाव कराल ?

जर तुम्हाला प्रवासादरम्यान तुमचा फोन सुरक्षितपणे चार्ज करायचा आहे तर नेहमी स्वत:सोबत चार्जर आणि केबल सोबत ठेवावा. सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे फोनला थेट वॉल सॉकेटने चार्जिंग करावे. जर तुमच्याकडे पॉवर बँक असेल तर त्यास आधी चार्ज ठेवा आणि गरज लागल्यास त्याने आपला फोन चार्ज करावा. याने तुमचा फोन देखील सुरक्षित राहिल आणि कोणत्याही प्रकारच्या डेटा चोरी वा बँक फ्रॉडचा धोका राहणार नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...