AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे झाड असणं म्हणजे सांपाना घरात बोलावणं; साप नेहमी तुमच्या घराच्या आसपास येणारच, तुम्हीही लावलंय का?

असे अनेक झाडं आहेत, ज्यांच्या नैसर्गिक रचनेमुळे साप या झाडांकडे आकर्षित होतो. त्यातील अनेक झाडं तर आपण घरात लावण्याची देखील चूक करतो. मात्र अशी झाडं घरात लावणं धोकादायक ठरू शकतात.

हे झाड असणं म्हणजे सांपाना घरात बोलावणं; साप नेहमी तुमच्या घराच्या आसपास येणारच, तुम्हीही लावलंय का?
SnakesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 10:15 PM
Share

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात अनेक जण आपल्या घरात किंवा बागेमध्ये वेगवेगळी झाडं लावत असतात. अनेकांना बागेची आवड असते. पावसाळ्याच्या काळात अनेक जण सुंदर सुंदर फुलांची आणि फळांची झाडं लावतात. परंतु यातील काही झाडांची नैसर्गिक रचनाच अशी असते की या झाडांकडे साप आकर्षित होतात. पावसाळ्यात तर धोका आणखी वाढतो. कारण पावसाळ्यात सतत या झाडांखाली ओल असते, तसेच सर्वत्र गवत देखील वाढलेलं असतं, त्यामुळे सापांना लपण्यासाठी सहज जागा उपलब्ध होते. सापांबद्दल अनेकाच्या मनात हा मोठा गैरसमज असतो की, साप झाडांना असलेल्या फुलांच्या वासामुळे त्याकडे आकर्षित होतात, परंतु हा गैरसमज आहे. साप वासामुळे या झाडांकडे आकर्षित होत नाहीत. तर पावसाळ्याच्या काळात सापांना या झाडाखाली सुरक्षित वातावरणाची निर्मिती होते, म्हणून साप अशा झाडांकडे आकर्षित होतात.

यातीलच एक झाड आहे, ते म्हणजे कन्हेराचं झाड, या झाडाला सुंदर अशी लाल फुलं येतात. परंतु पावसाळ्याच्या काळात हे झाड धोकादायक ठरू शकतं. कारण हे झाड उंच वाढतं, तसेच या झाडाखाली पानांमुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. झाडाला दाट पानं असल्यामुळे झाडाखालची जमीन देखील पावसामुळे भिजत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात सापांना या झाडाखाली लपण्यासाठी सुरक्षित जागा सापडते. या झाडाच्या मुळाशी साप लपतात. तसेच पावसाळ्याच्या काळात झाडाच्या आजूबाजुला गवत वाढल्यामुळ झाडाखाली साप असल्याचं देखील लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे शक्यतो असे झाडं घरापासून थोड्या दूर अंतरावरच लावावेत. तसेच पावसाळ्याच्या काळात अशा झाडांची मशागत करताना किंवा तिथे जाताना योग्य ती काळजी घ्यावी, पायात नेहमी बूट घालूनच जावे, ज्यामुळे तुमचा बचाव होऊ शकेल.

पावसाळ्याच्या काळात अनेकदा साप बाहेर फिरताना दिसतात. कारण पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी शिरतं. तसेच हा काळ अनेक प्रजातीच्या सांपाच्या प्रजननाचा काळा देखील असतो, त्यामुळे साप अधिकच आक्रमक बनतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं असतं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...