AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले

"सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचचं आहे. ते तरुणाईकडे अशा पद्धतीने पाहत असतील तर ती चांगली गोष्ट नाही. त्यांनी ते दुरुस्त करावं हे माझं व्यक्तिगत मत आहे" असं बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले
Bacchu Kadu
| Updated on: Jul 21, 2026 | 6:55 PM
Share

दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली. त्यांची दहशतवाद्यांसोबत तुलना केली. शिवाय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी केली. सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची दहशतवाद्यांबरोबर तुलना केली, त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य फार चुकीचं आहे. आपण आपल्याच देशातल्या लोकांना आतंकवादी ठरवत असू तर त्याचे देशभरात चांगले परिणाम होणार नाहीत. वाईट परिणाम दिसतील. सदाभाऊ खोत यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे” असं बच्चू कडू म्हणाले.

“आंदोलन मुद्यावर होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. राजीनाम्यापेक्षा जर या सगळ्या परीक्षा अजून मजबूतीने होण्यासाठी मागणी केली असती, समितीला न्यायालयीन दर्जा कसा मिळेल. विद्यार्थ्यांच्या या मागच्या भूमिका काय आहेत. आजच्या तरुणांकडे नोकरीशिवाय काही पर्याय आहेत का? शेती नुकसानीत आहे, उद्योगाची समस्या आहे” असं बच्चू कडू म्हणाले.

कायमस्वरुपी व्यवस्था झाली असती

“सदाभाऊ खोत जे बोलले, त्याचा निषेध करतो. पण राजीनाम्यापेक्षा मागणीला दुसरी बाजू दिली असती तर त्याचं महत्व वाढलं असतं. दर्जा प्राप्त झाला असता. कायमस्वरुपी व्यवस्था झाली असती. राजीनामा देऊन कायम स्वरुपी व्यवस्था होणार आहे का?. आज दुसरामंत्री येईल, उद्या तिसरा मंत्री येईल. राजीनामा घेतला तर त्याशिवाय हाती काय भेटणार आहे” असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

हे माझं व्यक्तिगत मत आहे

“सदाभाऊ खोत यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचचं आहे. ते तरुणाईकडे अशा पद्धतीने पाहत असतील तर ती चांगली गोष्ट नाही. त्यांनी ते दुरुस्त करावं हे माझं व्यक्तिगत मत आहे. आंदोलन या देशाचा आत्मा आहे. आंदोलनातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आंदोलनकरी दोषी नसतात. त्यांनी दृष्टीकोन बदलला पाहिजे” असं बच्चू कडू म्हणाले. दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे.  त्यावर सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलं.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?