AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं गेल्या तीन तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले असून, समोर आलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं आहे.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं
राहुल गांधी यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 21, 2026 | 7:01 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं गेल्या तीन तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आता आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले असून, समोर आलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा  अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीची आहे, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान सोमवारी कॅकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं.

एकीकडे जंतर मंतरवर आज देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरूच आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तब्बल तीन तासांपासून हे आंदोलन सुरू असून, राहुल गांधी यांनी सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत. दरम्यान आता आंदोलन स्थळी पोलीस पोहोचले असून, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काय आहेत राहुल गांधी यांच्या मागण्या?

राहुल गांधी यांच्या आंदोलनाची दखल घेत मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्यासमोर पाच मागण्या ठेवल्या आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठी मागणी आहे ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी संसदेत निवेदन द्यावे, नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या राहुल गांधी यांनी केल्या आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता राहुल गांधी आणि प्रियकां गांंधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले.

Bachchu Kadu : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बच्चू कडू मुद्याचं, समोरच्याला विचार करायला भाग पाडणारं बोलले

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर….

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल….

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…