AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकवेळी दूध उतू जाऊन शेगडीवर सांडतयं तर अवलंबवा ‘ही’ सोपी ट्रिक

नेहमी दूध शेगडीवर तापवण्यासाठी ठेवल्यावर अनेकदा उतू जातं ज्यामळे दूधही वाया जाते आणि शेगडी देखील खराब होते. तर हे टाळण्यासाठी या काही सोप्या स्वयंपाकघरातील ट्रिक्स आहेत ज्याचा अवलंब केल्याने दूध उतू जाण्याची आणि गॅसवर सांडण्याची समस्या सहज कमी करता येते.

प्रत्येकवेळी दूध उतू जाऊन शेगडीवर सांडतयं तर अवलंबवा 'ही' सोपी ट्रिक
milk and kitchenImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 19, 2026 | 9:58 PM
Share

भारतीय घरांमध्ये दूध सांडणे हे वास्तूनुसार शुभ मानले जाते जेव्हा नवीन घराची वास्तू शांती केली जाते. आपल्या प्रत्येकालाच सकाळी उठल्या उठल्या दूधाचा गरमागरम चहा कॉफी लागते. त्यामुळे रोज स्वयंपाकघरात सकाळी आणि संध्याकाळी दूध उकळणे ही एक सामान्य दैनंदिन क्रिया बनली. पण आपण अनेकांच्या तोंडून ऐकतोच की थोडसं लक्ष इकडे तिकडे गेलं की दूध उतू जाते आणि सांडते. यामुळे केवळ दूधच वाया जात नाही, तर गॅस स्टोव्हदेखील खराब होतो. तो स्वच्छ करण्यासाठी वेळ आणि मेहनत दोन्ही लागते. ही समस्या जवळपास प्रत्येक घरात सामान्य आहे. अशातच ही समस्या टाळण्यासाठी काही सोप्या पद्धतींनी तुम्ही हा त्रास पूर्णपणे दूर करू शकता. याचा अर्थ तुम्ही गॅस स्टोव्हवर वारंवार दूध सांडण्यापासून रोखू शकता. चला त्या अनोख्या पद्धती जाणून घेऊया.

दूध उतू जाण्यापासून रोखण्याची सोप्या टिप्स

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्ही फक्त तूप आणि लोण्याचा वापर करून दूध उतू जाण्यापासून रोखू शकता. होय, फक्त तूप आणि लोण्याने. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की दूध उकळण्यापूर्वी भांड्याच्या वरच्या कडांना तुपाचा एक पातळ थर लावावा. असे केल्याने, दूध उकळताना होणारी त्याची उकळी आणि फेस कमी होतो, ज्यामुळे दूध एकाच जागी राहते.

दुसरा पर्याय म्हणून तुम्ही दूध उकळण्यापूर्वी एक लाकडी चमचा किंवा पळी आडवी ठेवू शकता. यामुळे फेस जमा होण्यास प्रतिबंध होतो आणि दूध उकळण्याची गती मंदावते.

तिसरा आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे दूध जास्त आचेऐवजी मध्यम आचेवर ठेवा. आच नियंत्रित केल्याने दूध उकळण्याचा वेग नियंत्रित करण्यास देखील मदत होते.

लक्षात ठेवण्यासारख्या इतर गोष्टी

या घरगुती उपायांसोबतच काही लहान गोष्टी लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. दूध उकळताना रुंद तोंडाचे भांडे वापरणे उत्तम असते, कारण यामुळे फेस पसरतो आणि दूध सांडत नाही. तसेच दूध उकळायला लागताच गॅसची आच थोडी कमी करा. यामुळे दूध हळूहळू उकळते आणि ते उतू जाण्याचा धोका कमी होतो. शिवाय दूध सांडू नये यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे दूध उकळताना भांड्याजवळ उभे राहणे. जर तुम्ही पहिल्यांदा उकळी आल्यावर लगेच गॅसची आच कमी केली, तर दूध सांडण्याआधीच थांबेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा