AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डान्स करत शिकवण्याची भन्नाट पद्धत; या शिक्षिकेच्या व्हिडिओला कोट्यवधी लोकांची पसंती, कोण आहे ती?

'आज मंगलवार है चूहे को बुखार है' गाण्यावर डान्स करत लहान मुलांना शिकवणारी ही मॅडम कोण? दररोज लाखो लोक बघतात तिचे व्हिडीओ.

डान्स करत शिकवण्याची भन्नाट पद्धत; या शिक्षिकेच्या व्हिडिओला कोट्यवधी लोकांची पसंती, कोण आहे ती?
| Updated on: Jul 19, 2026 | 12:10 PM
Share

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील चांदनी भाटी या आपल्या वेगळ्या आणि आनंददायी अध्यापन पद्धतीमुळे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करण्याऐवजी नाचत, गात, खेळत आणि हसत-हसत शिक्षण देण्याची तिची पद्धत लाखो लोकांना भावली आहे. त्यामुळे तिचे व्हिडिओ इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून काही व्हिडिओंना तब्बल 119 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

शालेय शिक्षण म्हणजे कंटाळवाणे असते अशी अनेकांची धारणा आहे. मात्र, चांदनी भाटीने ही समजूत मोडून काढली आहे. वर्गात ती स्वतःही विद्यार्थ्यांमध्ये मिसळून लहान मुलांसारखी वावरते. कविता, गाणी आणि धडे शिकवताना ती नृत्य, अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव आणि आकर्षक हालचालींचा वापर करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना धडे सहज लक्षात राहतात आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी बनते.

‘आज मंगलवार है, चूहें को बुखार है’ आणि ‘तितली उड़ी बस में चढ़ी’ अशा बालगीतांच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांना शिकवताना दिसते. तिच्या मते, अशा प्रकारच्या कविता आणि गाण्यांमुळे मुलांचे वर्गातील लक्ष टिकून राहते. विशेषतः विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ लागल्यास ही पद्धत त्यांना पुन्हा अभ्यासात गुंतवून ठेवण्यास मदत करते.

सोशल मीडियावर लाखो चाहते

चांदनी भाटी ही केवळ शाळेतील व्हाइस हेड म्हणूनच कार्यरत नाही तर ती सोशल मीडियावरही लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बनली आहे. इंस्टाग्रामवर तिचे 18 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारो प्रतिक्रिया मिळतात. तिच्या अनोख्या अध्यापन शैलीचे अनेकजण कौतुक करत असून, तिला ‘कूल टीचर’ अशी ओळख मिळाली आहे.

प्रेमाने शिकवण्यामागे आहे वैयक्तिक अनुभव

चांदनीची ही अध्यापन पद्धत स्वीकारण्यामागे तिच्या बालपणीचा अनुभव कारणीभूत आहे. ती सांगते की, शाळेत असताना काही शिक्षक विद्यार्थ्यांना रागावत, ओरडत आणि मारहाणही करत असत. त्या भीतीचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला होता. तेव्हाच तिने ठरवले होते की, भविष्यात आपण शिक्षिका झालो तर विद्यार्थ्यांना भीती दाखवून नाही तर प्रेम, आपुलकी आणि आनंदाच्या वातावरणात शिकवायचे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय