AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार, दिल्लीत घडामोडींना वेग, अरविंद सावंत म्हणाले, सुरूवातच..

आज सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलावण्यात आली होती. मात्र, बैठकीला सुरूवात होऊन काही वेळ होताच विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाचे प्रमुख गट नेत्यांनी बैठकीतून बाहेर येत बहिष्कार टाकला. यावर अरविंद सावंत यांनी मोठे भाष्य केले.

सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार, दिल्लीत घडामोडींना वेग, अरविंद सावंत म्हणाले, सुरूवातच..
Arvind Sawant
| Updated on: Jul 19, 2026 | 11:57 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यातच काल या बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आता TMC च्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी जोरदार विरोध करत बैठक सोडली आणि बैठकीवर बहिष्कार टाकला. यावर नुकताच खासदार अरविंद सावंत यांनी मोठे विधान केले. अरविंद सावंत यांनी म्हटले की, सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीत तृणमूल काँग्रेस आणि आम्ही आमच्या पक्षातून लोक बाहेर पडले तृणमूल काँग्रेसची संख्या 28 केली आणि जे 20 जण आहेत, त्यांना वेगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

ते ज्या पक्षात गेले तो पक्षच कुठे अस्थित्वात आहे की नाही माहिती नाही. त्यांचा मुद्दा वेगळा आहे आणि आमचा मुद्दा वेगळा आहे. आमच्या मुद्द्यात त्यांनी सुरूवातच अशी केलेली आहे की, 6 जणांना आम्ही अॅपिलेशन मान्य केले. पण अॅपिलिकेशन हा शब्द कायद्यात कुठेही मान्य नाही. घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नसताना अशा लोकांना मान्यता देणे गैर आहे.

म्हणून आज आम्ही सर्वांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. सर्वपक्षीय बैठकीतून विरोधक बाहेर पडले आहेत. या सर्वपक्षीय बैठकीत सर्वच प्रमुख नेते पोहोचले होते. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पक्षाचे नेते बैठकीला पोहोचले होते. मात्र, बैठकीला सुरूवात होताच यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीतून बाहेर येण्याचा निर्णय घेतला.

तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्याच गटाच्या गटनेत्याला या बैठकीला बोलावण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले. हे 20 खासदार तृणमूल काँग्रेसचेच असल्याचा दावा करण्यात आला. उद्यापासून अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्यापूर्वीच विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. हे अधिवेशन जोरदार गाजणार असल्याचे स्पष्ट आहे.

Follow Us
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा