AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात ट्विस्ट; आधी म्हात्रेंचा जामीन रद्द केला, नंतर सीसीटीव्हीत दिसणाऱ्या 5 व्या महिला आरोपीला अटक

ramesh mhatre case : रमेश म्हात्रे यांचा जामीन कोर्टाने रद्द केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील 5 व्या आरोपीला अटक केली आहे.

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात ट्विस्ट; आधी म्हात्रेंचा जामीन रद्द केला, नंतर सीसीटीव्हीत दिसणाऱ्या 5 व्या महिला आरोपीला अटक
| Updated on: Jul 19, 2026 | 11:55 AM
Share

मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह 4 जणांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणात मारहाणीवेळी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या पाचव्या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाचवी आरोपी साधना कारंडे हिला अटक करण्यात आली आहे. साधनाला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यानंतर तिच्यावर पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

मिळाल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रियांका उधमाळेची आई साधना कारंडे हिला शनिनारी रात्री पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मारहाणीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधना कारंडे दिसत असल्याने तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी तिला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अटकेची कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी तिला राहत्या घरातून ताब्यात घेतले.

प्रियांकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर साधना कारंडे हिला आज रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात हायकोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे तपासाला वेग आला आहे. आता आरोपींवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे साधना कारंडे हिला रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर तिच्यावर पुढील कारवाई काय केली जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे जामिनावर बाहेर असलेले रमेश म्हात्रे सायंकाळी ५ वाजेपर्यंत आत्मसमर्पण करतात की पोलिसांना त्यांचा शोध घ्यावा लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,  नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगाही एका फसवणूक प्रकरणात फरार आहे. नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मुलाच्या अटकेसाठी तक्रारदाराचे कल्याणमध्ये बेमुदत उपोषण पुकारलं आहे. आता या दोन्ही प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. त्यात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केलं. ‘डॉक्टर मारहाण प्रकरणातील कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. खरंतर आम्ही आधीच भूमिका स्पष्ट केली आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...