AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500 वाहनं नदीत वाहून गेली

सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500 वाहनं नदीत वाहून गेली

| Updated on: Jul 19, 2026 | 12:03 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक भाग जलमय झाले आहेत. पुराच्या वेगामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार...

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठा पूर आला असून अनेक भाग जलमय झाले आहेत. पुराच्या वेगामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, भयानक पुरात तब्बल 500 वाहने वाहून गेल्याची माहिती समोर आली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू असून काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुराचा वेग अधिक असल्याने अनेक ठिकाणी संपर्कही तुटल्याची माहिती मिळत आहे.

सोशल मीडियावर या पुराचे अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामध्ये प्रचंड वेगाने वाहणारे पाणी आणि त्यात वाहून जाणारी वाहने दिसत आहेत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन पुढील काही तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Published on: Jul 19, 2026 11:35 AM

Follow Us