बंड करण्याआधी एकनाथ शिंदे माझ्यासोबत… संजय राऊतांनी सांगितला ‘तो’ किस्सा
सध्या राज्यभर राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाने खळबळ उडावली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चोरी विरोधात उबाठा ठाकरे गट अनेक ठिकाणी आंदोलन करत आहे. ठाकरे गटाने सर्वात आधी दादर येथे रामरक्षा आमदोलन केलं होतं. इतकेच नाही तर त्यांनी यांतरही अनेक ठिकाणी रामरक्षा आंदोलन केलं.
सध्या राज्यभर राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाने खळबळ उडावली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चोरी विरोधात उबाठा ठाकरे गट अनेक ठिकाणी आंदोलन करत आहे. ठाकरे गटाने सर्वात आधी दादर येथे रामरक्षा आमदोलन केलं होतं. इतकेच नाही तर त्यांनी यांतरही अनेक ठिकाणी रामरक्षा आंदोलन केलं. उबाठाच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ठाकरेंनी मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनात सहभागी व्हा सांगता अशात, तुम्ही राहुल गांधी, सोनिया गांधी यांना का बोलवत नाहीत? यावर आता पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे स्वतःच का मैदानात उतरत नाहीत, ते नेमक्या कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत? अरे हे सर्व जण, ते स्वतः गद्दारी करण्याच्या दोन दिवसांआधी माझ्यासोबत अयोध्येला होते. तरी यांनी बंडखोरी केली. आणि तुम्ही नोटा मोजण्यापेक्षा वृत्तपत्राकडे लक्ष द्या… पेपर वाचा राहुल गांधी यांनीच राम मंदिरातील कथित चोरीचं प्रकरण समोर आणलं आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, सहा खासदार निर्लज्ज आहे. गद्दार शब्दही कमी पडेल. हा लोकशाहीवरचा बलात्कार करून खून, गुन्हे घडतात ना, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहे सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलरही आहे लोकशाहीचे. ५० -५० कोटीला लोकं विकत घेत आहेत. लोकांना खायला मिळत नाही. लोक उपोषणाला बसले आहेत. यू आर सीरियल रेपिस्ट अँड सीरियल किलर आहात लोकशाहीचे.
Published on: Jul 19, 2026 11:07 AM
बंड करण्याआधी एकनाथ शिंदे माझ्यासोबत... संजय राऊतांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र प्रधान धर्मात्मा नाहीत! संजय राऊतांचा थेट निशाणा
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार!
थेट लोकसभा सचिवालयातून अधिकृत पत्र अन्... ठाकरेंचे 6 फुटीर खासदार

