AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार! मुंबईत आज मोर्चा

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंची सेना रस्त्यावर उतरणार! मुंबईत आज मोर्चा

| Updated on: Jul 19, 2026 | 11:04 AM
Share

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही राजकीय पाठिंबा मिळताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज मुंबईत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे विशेष पथक सातत्याने लक्ष ठेवून असून, परिस्थितीवर रुग्णालय प्रशासनाकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असताना, मुंबईतील हा मोर्चा आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 19, 2026 10:33 AM

Follow Us