AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा जागतिक डंका! ब्राझीलला हरवत मिनर्व्हा अकादमीने जिंकला Gothia Cup 2026

भारताचा जागतिक डंका! ब्राझीलला हरवत मिनर्व्हा अकादमीने जिंकला Gothia Cup 2026

| Updated on: Jul 19, 2026 | 11:21 AM
Share

भारतीय फुटबॉलसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. भारताच्या मिनर्व्हा अकादमीने प्रतिष्ठित गोथिया कप 2026 जिंकत आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वीडनमधील गोटेबर्ग येथे झालेल्या अंतिम सामन्यात मिनर्व्हा अकादमीने ब्राझीलच्या बलाढ्य आर.एस. स्पोर्ट्स संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. 13 ते 19 जुलै 2026 या कालावधीत पार पडलेल्या गोथिया कप स्पर्धेत 11 वर्षांखालील ते 19 वर्षांखालील वयोगटातील 1,700 हून अधिक संघ आणि 40 हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित राहून विजेतेपद पटकावल्याने देशाच्या फुटबॉल इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे.

अंतिम सामन्यात मिनर्व्हाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला टी. किपगेन याने शानदार गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ब्राझीलच्या आर.एस. स्पोर्ट्सने जोरदार पुनरागमन करत पहिल्या सत्राअखेर सामना 1-1 असा बरोबरीत आणला. दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने संयमी आणि शिस्तबद्ध खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अखेर सामन्याच्या 49व्या मिनिटाला नोंगरेम याने निर्णायक गोल करत मिनर्व्हाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत भारतीय बचावफळीने भक्कम कामगिरी करत ही आघाडी कायम राखली आणि अंतिम शिट्टी वाजताच मिनर्व्हा अकादमीने ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे, मिनर्व्हा अकादमीने स्पर्धेतील सर्व आठ सामने जिंकत शंभर टक्के विजयाची नोंद केली. संघाने संपूर्ण स्पर्धेत तब्बल 86 गोल केले, तर केवळ 7 गोल स्वीकारले. ब्राझील, फ्रान्स आणि बोलिव्हियासारख्या बलाढ्य देशांच्या युवा संघांना पराभूत करत भारतीय फुटबॉलची ताकद जागतिक स्तरावर सिद्ध केली. या ऐतिहासिक यशामुळे भारतातील युवा फुटबॉलला नवी दिशा मिळाली असून, भारतीय फुटबॉलचे भविष्य अधिक उज्ज्वल असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Published on: Jul 19, 2026 11:21 AM

Follow Us
ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल… संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका...

ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल… संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका..

खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर….

खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर…

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात.

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय? शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? संजय राऊत संतापले.

अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय? शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? संजय राऊत संतापले

प्रत्येक मुलाच्या मनाला भिडणार गाणं,अनेकदा ऐकूनही मन भरत नाही, अखेर राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळवलाच.

प्रत्येक मुलाच्या मनाला भिडणार गाणं,अनेकदा ऐकूनही मन भरत नाही, अखेर राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळवलाच

निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग.

निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग