AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट लोकसभा सचिवालयातून अधिकृत पत्र अन्... ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत मोठी अपडेट

थेट लोकसभा सचिवालयातून अधिकृत पत्र अन्… ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत मोठी अपडेट

| Updated on: Jul 19, 2026 | 10:32 AM
Share

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षातील 6 बंडखोर खासदारांच्या गटाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरण करण्यास लोकसभा सचिवालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे 6 खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटाचा भाग मानले जाणार आहेत. या निर्णयामुळे लोकसभेतील शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे.

या घडामोडीपूर्वी बंडखोर खासदारांनी ठाकरे गटापासून वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले होते. त्यानंतर ठाकरे गटानेही लोकसभा अध्यक्षांना पत्र देत पक्षाने कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले होते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली होती.

मात्र, लोकसभा सचिवालयाने बंडखोर खासदारांच्या गटाचे शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरण मंजूर केले आहे. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 19, 2026 10:32 AM

Follow Us