AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची आग भडकली, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावामुळे ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल जवळपास ८८ डॉलरवर पोहोचल्या आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याच्या शक्यतेने बाजारातील चिंता वाढवली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची आग भडकली, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार?
पेट्रोल डिझेलच्या किंमतीImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 19, 2026 | 11:33 AM
Share

अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध भडकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर या युद्धाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामागे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव मुख्य कारण आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत, ज्यामुळे मध्य पूर्वातील तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. याचा परिणाम जागतिक तेल बाजारावर स्पष्ट दिसत आहे. याचा परिणाम आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

भारतात १९ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझलचे दर पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल २५ मे २०२६ रोजी करण्यात आला होता. त्यानंतर किंमती स्थिर आहेत.

शहरानुसार किंमती (१९ जुलै २०२६):

नवी दिल्ली : पेट्रोल ₹१०२.१२ | डिझेल ₹९५.२० कोलकाता : पेट्रोल ₹११३.५१ | डिझेल ₹९९.८२ मुंबई : पेट्रोल ₹१११.२१ | डिझेल ₹९७.८३ चेन्नई : पेट्रोल ₹१०७.७७ | डिझेल ₹९९.५५

कच्चे तेल का महाग होत आहे?

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक गंभीर झाला आहे. दोन्ही देश एकमेकांच्या सैन्य ठिकाणांसह पुल, वीज व्यवस्था आणि बंदरांसारख्या महत्त्वाच्या सुविधांवर हल्ले करत आहेत. यामुळे मध्य पूर्वात तेल वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. सर्वांत मोठी चिंता हॉर्मुज स्ट्रेटची आहे. हे जगातील सर्वात महत्त्वाचे तेल मार्गांपैकी एक आहे. येथून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल जगभरात पोहोचते. जर येथील पुरवठा प्रभावित झाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात.

ब्रेंट क्रूडमध्ये मोठी वाढ

या आठवड्यातील तणावामुळे शुक्रवारी ब्रेंट क्रूडच्या किंमतीत सुमारे ४.६ टक्क्यांची वाढ झाली आणि ती ८८ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेली. एप्रिलनंतर ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ आहे. गेल्या एका आठवड्यात कच्च्या तेलात ११ टक्के वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युद्ध प्रदीर्घ काळ चालले तर तेल पुरवठा प्रभावित होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना आहे. याच भीतीमुळे किंमती वाढल्या आहेत.

भारतात पेट्रोल-डिझेल का महागले नाहीत?

भारतात पेट्रोल आणि डीजलच्या किरकोळ किंमती सरकारी तेल विपणन कंपन्या (OMCs) ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाल्यानेही कंपन्यांनी सध्या देशांतर्गत किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, भारत आपल्या गरजेच्या बहुतेक कच्च्या तेलाची आयात परदेशातून करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती दीर्घकाळ उच्च राहिल्या तर भविष्यात पेट्रोल आणि डीजलच्या किंमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…