पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून गिरिश महाजनांना निमंत्रण
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या भेटीनंतर मोठ्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली यांनंतर एकनाथ खडसे यांनी मोठे दावे केले होते. आता पुन्हा या चर्चांना उधाण आलं आहे. NCP नेते एकनाथ खडसे यांच्या स्वीय सहाय्यकाने मंत्री गिरिश महाजनांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं. हे निमंत्रण वाढदिवसानिमित्ताने दिल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे गिरिश महाजनांनी या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
Published on: Jul 19, 2026 12:02 PM
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..