AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…

मी जे विधान केले ते इंडिया आघाडीशी संंबंधित होते. इंडिया आघाडी आणि त्या आघाडीतील पक्ष या आंदोलनाच्या आडून दहशतवादी विचार राज्यात आणि देशात पसरवत आहेत, असं मी बोललो होतो, असं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिलं.

'आंदोलक आतंकवादी', त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर...
sadabhau khotImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2026 | 6:27 PM
Share

Sadabhau Khot : सध्या दिल्लीमध्ये अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका आंदोलकांची आहे. सध्या दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर हजारो आंदोलक उपस्थित आहेत. या आंदोलनस्थळी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे अनेक बडे राजकीय नेते आंदोलनस्थळी जाऊन दीपके यांची भेट घेत आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची दहशतवाद्यांशी तुलना केली. त्यांच्या वादग्रस्त विधानावर आक्षेप व्यक्त केला जातोय. आता यावरच खोत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मोदी यांचे सरकार हटवण्यासाठी आंदोलन

विद्यार्थ्यांचे जे मत आहे त्या मताच्या आम्ही सोबत आहोत. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून जे राजकारण केले जात आहे, त्याला मी विरोध करतो. मीदेखील विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केलेले आहे. आता नीटच्या मुद्द्यावरून आंदोलन केले जात आहे की मोदी यांचे सरकार हटवण्यासाठी आंदोलन केले जात आहे हेच समजत नाही. या आंदोलनाचा नेमका मुद्दा काय आहे, तेच समजायला मार्ग नाही. हे आंदोलन भरकटले आहे. हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, असा गंभीर आरोपही खोत यांनी केला.

काही लोक आंदोलनात औरंगजेबाचे फोटो घेऊन गेले होते. औरंगजेब आणि नीट परीक्षेचा संबंध काय. हे आंदोलन दंगल घडवण्यासाठी केले जात आहे. आंदोलन करण्याचा सर्वांनाच हक्क आहे. सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. नीट परीक्षेत जो घोटाळा झाला, त्या प्रकरणाती आरोपींना पकडण्यात आले आहे. आता नीटची परीक्षा नव्याने झाली आहे. त्यामुळे या आंदोलनाला काही अर्थ उरत नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. हे चुकीचे आहे, असे मत खोत यांनी व्यक्त केले.

दहशतवादी विधानावर काय दिले स्पष्टीकरण?

मी जे विधान केले ते इंडिया आघाडीशी संंबंधित होते. इंडिया आघाडी आणि त्या आघाडीतील पक्ष या आंदोलनाच्या आडून दहशतवादी विचार राज्यात आणि देशात पसरवत आहेत, असं मी बोललो होतो. सोशल मीडियावर पाहिलं तर महाविकास आघाडीचे काम असेच चाललेले आहे. विद्यार्थ्यांसाठी आम्हीदेखील लढा उभारलेला आहे. नीट पेपरफुटीचा मुद्दा आता बाजूला पडला आहे. मुद्द्याला सोडून हे आंदोलन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या मोदी सरकारविरोधात घोषणा आहेत. सरकार हटवाची त्यांची भूमिका आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...