AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7500mAh बॅटरीसह भारतात लवकरच लाँच होणार Redmi 17, बजेट फ्रेंडली किमतीत मिळणार उत्तम फिचर्स

रेडमी 17 लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार यामध्ये 6.9-इंचाचा 120Hz डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ जी91 अल्ट्रा प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंगसह 7500mAh बॅटरी असू शकते. चला तर मग या फोनच्या खास फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

7500mAh बॅटरीसह भारतात लवकरच लाँच होणार Redmi 17, बजेट फ्रेंडली किमतीत मिळणार उत्तम फिचर्स
Redmi 17Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 18, 2026 | 9:35 PM
Share

रेडमी आपल्या बजेट स्मार्टफोन पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन रेडमी 17 भारतीय बाजारपेठेत लाँच करू शकते. हा फोन सध्याच्या रेडमी 15 चे अपग्रेड असल्याचे मानले जात आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, लाँच होण्यापूर्वीच त्याची संभाव्य किंमत, डिझाइन आणि वैशिष्ट्यांविषयी अनेक माहिती समोर आली आहे. मोठी बॅटरी आणि पॉवरफूल वैशिष्ट्यांसह,हा फोन बजेट सेगमेंटमध्ये एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग याफोनबद्दल त्याचे फिचर्स आणि संभाव्य किंमत जाणून घेऊयात.

अपेक्षित किंमत आणि स्टोरेज

लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार रेडमी 17 दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो पहिला व्हेरिएंट 4GB रॅम + 128GB स्टोरेजसह येईल, तर दुसऱ्यामध्ये 6GB रॅम + 256GB स्टोरेज असू शकते.

किंमतीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या फोनच्या बेस मॉडेलची किंमत सुमारे 250 युरो म्हणजे भारतीय चलनानुसार अंदाजे 28 हजार रूपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे, तर टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलची किंमत 280 युरो अंदाजे 31 हजार रूपयांपर्यंत किंमत असू शकते.

डिझाइन आणि रंगाचे पर्याय

लीक झालेल्या रेंडर्सनुसार, रेडमी 17 आकर्षक डिझाइनसह येईल . कंपनी हा फोन डीप ब्लू, ब्लॅक, ओक ग्रीन आणि लोटस पर्पल या चार रंगांमध्ये लाँच करेल अशी अपेक्षा आहे. फोनचा लूक साधा आणि आधुनिक असून तो तरुणांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

रेडमी 17 मध्ये मोठा 6.9-इंचाचा HD+ फ्लॅट डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते, ज्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव अधिक सुरळीत होईल.

कामगिरीसाठी यात मीडियाटेक हेलिओ जी91 अल्ट्रा प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. हा चिपसेट दैनंदिन कामे, मल्टीटास्किंग आणि सामान्य गेमिंगसाठी चांगली कामगिरी देईल अशी अपेक्षा आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक अतिरिक्त सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा अपेक्षित आहे. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी 7500mAh बॅटरी. तसेच 45 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जलद चार्जिंग आणि जास्त वेळ वापर शक्य होईल.

सध्या कंपनीने लाँचची तारीख निश्चित केलेली नाही, परंतू मिळालेल्या माहितीच्या आधारे असे म्हणता येईल की, रेडमी 17 आपल्या मोठ्या बॅटरी, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि पॉवरफूल हार्डवेअरमुळे बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एक नवीन आव्हान उभे करू शकतो.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश