NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात नीट (NEET) परीक्षेच्या निकालाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार हिने आपल्या निकालात मोठी तफावत असल्याचा दावा करत संबंधित यंत्रणेकडे न्यायाची मागणी केली आहे. ज्ञानेश्वरी पवार हिच्या म्हणण्यानुसार, उत्तरपत्रिकेच्या पडताळणीनुसार तिला ७०२ गुण मिळणे अपेक्षित होते, मात्र अधिकृत निकालात तिला केवळ ८७ गुण देण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे निकालात मोठा घोळ झाल्याचा आरोप तिने केला आहे.

विद्यार्थिनीने दावा केला आहे की, तिची ओएमआर (OMR) शीट चुकीची तपासण्यात आली असून किंवा त्यात तांत्रिक त्रुटी झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मूळ ओएमआर शीट आणि वास्तविक गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी तिने केली आहे.
यासंदर्भात ज्ञानेश्वरी पवार हिने शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत, “आमची ओरिजिनल OMR शीट द्या आणि आमचे वास्तविक गुण जाहीर करा,” अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा नीट परीक्षेच्या निकालाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित यंत्रणा या तक्रारीची दखल घेऊन काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 18, 2026 04:22 PM
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...