AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!

मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!

| Updated on: Jul 19, 2026 | 11:09 AM
Share

पुण्यात 3 उन्नत महामार्गांच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्य आणि केंद्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदारानेही या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे या कार्यक्रमाला उपस्थि आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे इतर पक्षातील नेतेही उपस्थि असतना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत.

महामार्ग प्रकल्पांमुळे पुणे आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरिकांच्या प्रवासालाही मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात विकासकामांना गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमामुळे विकासासोबतच राजकीय चर्चांनाही वेग आला आहे.

Published on: Jul 18, 2026 04:27 PM

Follow Us