मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घशात सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आवाजाला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला दिला असून, त्यामुळे त्या पुढील काही काळ सार्वजनिक भाषणे आणि माध्यमांशी संवाद टाळणार आहेत. याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घशात सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आवाजाला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला दिला असून, त्यामुळे त्या पुढील काही काळ सार्वजनिक भाषणे आणि माध्यमांशी संवाद टाळणार आहेत. याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. त्यांनी सांगितले की, घसा आणि आवाजाच्या तपासणीसाठी त्यांनी कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद किर्तणे यांची भेट घेतली. तपासणीनंतर घशात सूज असल्याचे निदान झाल्याने डॉक्टरांनी आवाजाला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, त्या आता व्हॉईस थेरपी घेणार असून, पुढील एक ते दोन आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत. तसेच, सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारही त्यांनी व्यक्त केले आहेत.
दरम्यान, राज्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये सातत्याने सक्रिय असलेल्या सुप्रिया सुळे काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याने त्यांच्या पुढील दौऱ्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा कार्यकर्ते आणि समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Published on: Jul 18, 2026 04:58 PM
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!

