AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिबट्याला मारहाण केल्याचा आरोप; शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या, खडसेंची न्यायालयात धाव

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यांच्याविरोधात आता एकनाथ खडसे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. याचिका दाखल करण्यात आली आहे.

बिबट्याला मारहाण केल्याचा आरोप; शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या, खडसेंची न्यायालयात धाव
Eknath KhadseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 21, 2026 | 10:08 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आता एकनाथ खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान या संबंधित एकनाथ खडसेंनी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला मारहाण करून जखमी केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या आरोपांना उत्तर देताना बिबट्या गाव वस्तीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता, तो गाव वस्तीमध्ये शिरू नये, यासाठी आपण त्यावर काठी उगारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी न्यायालयात धाव घेत, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मुक्ताईनगर येथील विश्रामगृहात 12 एप्रिल 2026 रोजी बिबट्या शिरला होता. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. बिबट्याला इंजेक्शन मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र बिबट्या बेशुद्ध न होता तो गावात शिरण्याच्या तयारीत होता.  यावेळी मुक्ताईनगरचे आमदर चंद्रकांत पाटील यांनी रिस्क्यू करतेवेळी बिबट्याला मारहाण केली असा खडसेंचा आरोप आहे. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला रेस्क्यू केलं. या संबंधित एकनाथ खडसेंनी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पुढील सुनावणी  21 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून,  यावेळी फॉरेस्ट ऑफिसर आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना हजर राहण्यास न्यायालयाने सांगितल्याची माहिती वकिलाने दिली आहे.  त्यामुळे आता या प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी