AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वापरताना समस्या येत आहे का? तर नेमका काय प्रॉब्लेम येत आहे आता यावर मेटाने काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहा...

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ
facebook
| Updated on: Jul 19, 2026 | 2:11 PM
Share

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये फेसबुक सुरु होत नाहीये. अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की त्यांना फेसबुक वापरताना समस्या येत आहे. लॉगिन करण्याच्या प्रयत्न करताना, स्क्रीनवर Account Temporarily Unavailable असा संदेश दिसतो, ज्यामुळे यूजर्संना त्यांचे प्रोफाईल पाहता येत नाही. “ही समस्या लवकरच दूर होण्याची अपेक्षा आहे. कृपया काही मिनिटांनी पुन्हा प्रयत्न करा.” या संदेशावरुन असे सूचित होते की समस्या तांत्रिक बिघाडामुळे आहे आणि कंपनी ता लवकरच दुरुस्त करण्यासाठी काम करत आहे.

ही समस्या समोर आल्यानंतर, अनेक यूजर्संनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक बंद असल्याची माहिती शेअर केली. काही लोक लॉगिन करू शकत नसल्याचे सांगत आहेत, तर काहींना आधीच लॉगिन केलेल्या खात्यांमध्ये प्रवेश करताना समस्या येत आहेत. ही समस्या सर्व यूजर्संच्या बाबतीत आहे की काही खात्यांपुरती मर्यादित आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मेटाने या तांत्रिक समस्येबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. ही सर्व्हर-संबंधित त्रुटी आहे की एका विशिष्ट प्रदेशातील यूजर्संवर ही समस्या ओढवलेली दिसत आहे. हे देखील कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

यूजर्सने काय करावे?

जर तुम्हाला तुमच्या फेसबुक खात्यावर तोच संदेश दिसत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. सध्यासाठी, तुम्ही हे करू शकता:

  • काही मिनिटांनंतर पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा.
  • तुमचा पासवर्ड वारंवार बदलणे किंवा नवीन खाते तयार करणे टाळा.
  • तुमचे इंटरनेट कनेक्शन आणि ॲप अपडेट्स तपासा.
  • जर ही समस्या दीर्घकाळ टिकून राहिली, तर फेसबुककडून अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करा.
  • सध्याच्या माहितीनुसार, ही एक तात्पुरती तांत्रिक समस्या असल्याचे दिसते आणि कंपनीला लवकरच यावर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील फेसबुक-संबंधित तक्रारींमध्ये अचानक वाढ झाल्याचे नोंदवले आहे. अहवालानुसार, या समस्या अमेरिकेच्या वेळेनुसार पहाटे 3:34 च्या सुमारास सुरू झाल्या.

Follow Us