Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त…
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलनाची घोषणा केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलनाची घोषणा केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असून वाहतूक व्यवस्थेवरही विशेष लक्ष दिले जात आहे.
काल नागपूरमध्ये झालेल्या रामरक्षा पठण आंदोलनात संजय राऊत, चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युवकांच्या भवितव्यासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक 20 दिवसांपूर्वी त्यांच्या भेटीस आले होते, तर अभिजीत दिपके यांच्याशीही त्यांचा संपर्क झाला आहे.
आजच्या आंदोलनासाठी ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली असून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
Published on: Jul 19, 2026 02:05 PM
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...

