AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे पती विलियम इश्माइल?

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेटने वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. विलियम इश्माइल याच्याशी तिने चर्चमध्ये लग्न केलं असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे पती विलियम इश्माइल?
जेनिफर विंगेट, विलियम इश्माइलImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 19, 2026 | 1:35 PM
Share

‘दिल मिल गए’, ‘बेपनाह’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. घटस्फोटाच्या 12 वर्षांनंतर तिने बिझनेसमन विलियम इश्माइलशी दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. सोशल मीडियावर सध्या जेनिफरच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जेनिफरने 18 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये जेनिफर आणि विलियम हे हातात हात धरून चर्चबाहेर निघताना दिसत आहेत.

जेनिफरने ख्रिश्चन पद्धतीनुसार चर्चमध्ये लग्न केलं. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपलेस ब्राइडल गाऊन परिधान केला होता. तर विलियमने क्लासिक नेव्ही ब्ल्यू रंगाचा सूट आणि त्यावर क्रीम रंगाचा वेस्टकोट घातला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विलियम इश्माइल हा सिंगापूरचा एक बिझनेसमन आहे. गेल्या काही काळापासून तो जेनिफरला डेट करत होता. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती.

विलियमने युकेमध्ये इकोनॉमिक्स आणि फायनान्सचं शिक्षण घेतलं आहे. ग्लोबल फायनान्समध्ये करिअरची सुरुवात करण्यापूर्वी त्याने 2002 आणि 2005 दरम्यान बॅचलरची पदवी संपादित केली. तो सध्या एमएचसी डिजिटल ग्रुपमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि ट्रेडिंगचा संचालक म्हणून काम करत आहे. ही कंपनी डिजिटल एसेट्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रात काम करते. ऑक्टोबर 2022 मध्ये तो या कंपनीशी जोडला गेला होता.

विलियम लाइमलाइटपासून दूरच राहणं पसंत करतो. त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा प्रायव्हेट आहे आणि त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर फारच कमी माहिती आहे. एमएचसी डिजिटल ग्रुपमध्ये काम करण्याआधी विलियमने फायनान्शिअल सेक्टरमध्ये काम केलं होतं. त्याने सीबीएस इन्वेस्टमेंट बँकमध्ये जवळपास दहा वर्षे काम केल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे जेनिफर विंगेटबद्दल बोलायचं झाल्यास तिचं हे दुसरं लग्न आहे. तिने याआधी अभिनेता करण सिंह ग्रोवरशी लग्न केलं होतं. ‘दिल मिल गए’ या लोकप्रिय मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं.

जेनिफर आणि करणने 2012 मध्ये लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं लग्न फक्त दोन वर्षेच टिकलं. 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर 2016 मध्ये करणने अभिनेत्री बिपाशा बासूशी दुसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा